/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> नळदुर्ग तुळजापूर मार्गावरील तिर्थ खुर्द शिवारात ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; २५ वर्षीय युवक ठार- ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल-Motarcyle Accident News Live

Hot Posts

नळदुर्ग तुळजापूर मार्गावरील तिर्थ खुर्द शिवारात ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; २५ वर्षीय युवक ठार- ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल-Motarcyle Accident News Live

नळदुर्ग तुळजापूर मार्गावरील तिर्थ खुर्द शिवारात ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; २५ वर्षीय युवक ठार- ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल-Motarcyle Accident News Live 

तुळजापूर : तिर्थ खुर्द शिवारातील जेवळीकर पेट्रोल पंपाजवळ ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. नितीन राम जाधव (वय २५, रा. सलगरा दि., ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन जाधव हे १० ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक एमएच २५ एस ४३८० वरून जात होते. दरम्यान, तिर्थ खुर्द शिवारातील जेवळीकर पेट्रोल पंपाजवळ मागून येणाऱ्या केए ५६-६३०८ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली.

ट्रक चालकाने वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या अपघातात नितीन जाधव गंभीर जखमी झाले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मयताचे भाऊ मनोज राम जाधव (वय २६, रा. सलगरा दि., ता. तुळजापूर) यांनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६, १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातामुळे सलगरा दि. परिसरात हळहळ व्यक्त होत असून, निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments