प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कुमारी ऐश्वर्या गायकवाडचे बी.फार्मसीत उज्ज्वल यश.
--------------------------------------
आई-वडिलांचे स्वप्न साकार; ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव.
----------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे) :- तुळजापुर तालुक्यातील मौजे इटकळ येथे छोटेसे पान स्टॉल चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे नामदेव गायकवाड यांची ज्येष्ठ कन्या कुमारी ऐश्वर्या नामदेव गायकवाड हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बी.फार्मसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून पदवी प्राप्त केली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामस्थांतून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आणि जिद्दी असलेल्या ऐश्वर्याने शिक्षणाच्या मार्गातील अनेक अडचणींवर मात करीत आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. आपली मुलगी बी.फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून पदवीधर व्हावी, हे आई-वडिलांचे स्वप्न तिने प्रत्यक्षात साकार केले आहे.साध्या परिस्थितीतून आलेल्या ऐश्वर्याने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर मिळविलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. तिच्या यशामुळे गायकवाड कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला असून, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून ऐश्वर्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.ऐश्वर्याने यापुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीतही अशीच उत्तुंग भरारी घ्यावी आणि आपल्या कर्तृत्वाने आई-वडिलांचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी तिचे इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करीत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

0 Comments