/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश; चाकूचा धाक दाखवून ५.६९ लाखांचा ऐवज लंपास-murum Police Station Crime News

Hot Posts

भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश; चाकूचा धाक दाखवून ५.६९ लाखांचा ऐवज लंपास-murum Police Station Crime News

भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश; चाकूचा धाक दाखवून ५.६९ लाखांचा ऐवज लंपास-murum Police Station Crime News 


धाराशिव : उमरगा तालुक्यातील काळनिंबाळा येथे भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून दोन अनोळखी इसमांनी महिलेच्या घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा तब्बल ५ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली प्रेमनाथ सगर (वय २६, रा. काळनिंबाळा, ता. उमरगा, जि. धाराशिव) या त्यांच्या राहत्या घरी असताना दोन अनोळखी इसम भिक्षा मागण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरात आले. घरात आल्यानंतर या दोघांनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादीला धमकावले.

त्यानंतर आरोपींनी घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच मोबाईल फोन असा एकूण ₹५,६९,००० किंमतीचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेनंतर सोनाली सगर यांनी दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून मुरुम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेमुळे काळनिंबाळा परिसरात खळबळ उडाली असून, भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून लुटमार करणाऱ्या या दोन अनोळखी आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>