/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> नळदुर्ग : बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यातून १.४० लाख रुपये काढले; चौघांविरुद्ध गुन्हा -Naldurg Police Station Crime News

Hot Posts

नळदुर्ग : बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यातून १.४० लाख रुपये काढले; चौघांविरुद्ध गुन्हा -Naldurg Police Station Crime News

नळदुर्ग : बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यातून १.४० लाख रुपये काढले; चौघांविरुद्ध गुन्हा -

धाराशिव  / प्रतिनिधी : स्टेट बँक ऑफ इंडिया, अणदूर शाखेतील खातेदाराच्या खात्यातून बनावट कागदपत्रांचा वापर करून १ लाख ४० हजार रुपये काढून बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायकल रमेश चव्हाण, मनिषा रमेश चव्हाण, शांताबाई विठ्ठल माळी व अन्य एक इसम, रा. सेटलमेंट एरिया, सोलापूर, यांनी आपसात संगनमत करून बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटे व बनावट दस्तऐवज तयार केले.

या बनावट कागदपत्रांच्या आधारे अणदूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील खातेदार लक्ष्मण दाजीबा गायकवाड यांच्या खाते क्रमांक 11507350754 मधून १,४०,००० रुपये काढण्यात आले. या प्रकारामुळे बँकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी धनंजय इंगळे यांनी २९ ऑगस्ट २०२६ रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 319(2), 318(4), 336(3), 340(2), 351(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बनावट कागदपत्रे तयार करून बँक खात्यातून रक्कम काढण्याच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणातील आरोपींनी नेमकी कोणती कागदपत्रे वापरली, रक्कम कशा पद्धतीने काढण्यात आली आणि या फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास नळदुर्ग पोलिसांकडून सुरू आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>