वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ पत्रकार संजय निंबाळकर यांचा सत्कार-Pandharpur Live News Daily
पंढरपूर | प्रतिनिधी:- ज्येष्ठ पत्रकार संजय निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांना पुष्पहार घालून, फेटा बांधून आणि केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी पंचायत समिती सभापती दत्ता मगर यांच्या हस्ते संजय निंबाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमास सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी संजय निंबाळकर यांना निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.


0 Comments