/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> अणदूरमध्ये शेतातील जनावरांवरून दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल-Andur Crime News Live

Hot Posts

अणदूरमध्ये शेतातील जनावरांवरून दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल-Andur Crime News Live

अणदूरमध्ये शेतातील जनावरांवरून दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल-Andur Crime News Live 

लाथाबुक्क्यांसह दगड, लोखंडी रॉड व कुऱ्हाडीने मारहाण; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

 धाराशिव /प्रतिनिधी : शेतात जनावरे सोडल्याच्या कारणावरून तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अणदूर येथील पडीक शेत गट क्रमांक १५७/३/२ येथे जनावरे शेतात का सोडली, या कारणावरून पहिल्या गटातील प्रविण प्रकाश घोडके, भरत विलास घोडके, सतिश विलास घोडके, लता प्रकाश घोडके, श्रीदेवी सतिश घोडके व विलास बिरु घोडके यांनी निळकंठ लक्ष्मण घोडके यांच्याशी वाद घातल्याचा आरोप आहे.

या वादातून संबंधितांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ केली तसेच लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. निळकंठ घोडके यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 189(2), 190 व 191(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याच घटनेप्रकरणी दुसऱ्या गटाकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भरत विलास घोडके यांच्या फिर्यादीनुसार, निळकंठ लक्ष्मण घोडके, ओंकार निळकंठ घोडके, समर्थ निळकंठ घोडके, शिवाजी लक्ष्मण घोडके, लक्ष्मण निलाप्पा घोडके, लक्ष्मी निळकंठ घोडके, सत्यभामा शिवाजी घोडके व रेखाबाई लक्ष्मण घोडके यांनी शेतातून जनावरे काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून वाद घातल्याचा आरोप आहे.

या वादात शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉड व कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरूनही नळदुर्ग पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 189(2), 191(2) व 190 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

एकाच घटनेत दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने अणदूर परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>