मौजे इटकळ येथील भीमाशंकर मंगल कार्यालय येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त भव्य सन्मान सोहळा
--------------------------------------
स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक व शिक्षकांचा होणार सन्मान.
---------------------------------------
इटकळ ( दिनेश सलगरे):- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथील श्री भीमाशंकर सांस्कृतिक मंगल कार्यालय, यांच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक व आदर्श शिक्षकांचा भव्य गौरव व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा प्रेरणादायी कार्यक्रम मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता श्री भीमाशंकर सांस्कृतिक मंगल कार्यालय, इटकळ येथे संपन्न होणार असून ह.भ.प. पूज्य मल्लिनाथ महास्वामीजी यांच्या शुभहस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या वीर देशभक्तांना अभिवादन करण्याबरोबरच समाजघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये या सोहळ्याबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.कार्यक्रमात मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन, देशभक्त व स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार, आदर्श शिक्षकांचा गौरव तसेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रेरणादायी मार्गदर्शन असे विविध उपक्रम होणार आहेत.या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमास परिसरातील नागरिक, माजी सैनिक, शिक्षक, विद्यार्थी व सर्व देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक परमेश्वर हांनुरें यांनी केले आहे.


0 Comments