/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> Breaking News- पिशोर येथे वीज पडून तीन महिलांचा मृत्यू; दोघी महिला व एक पुरुष जखमी- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घटना

Hot Posts

Breaking News- पिशोर येथे वीज पडून तीन महिलांचा मृत्यू; दोघी महिला व एक पुरुष जखमी- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घटना

पिशोर येथे वीज पडून तीन महिलांचा मृत्यू; दोघी महिला व एक पुरुष जखमी- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घटना



शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळली; आमदार संजनाताई जाधव, तहसीलदार सरिका भगत यांच्याकडून घटनास्थळी व रुग्णालयात पाहणी

पिशोर येथे वीज पडून तीन महिलांचा मृत्यू; दोघी महिला व एक पुरुष जखमी- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घटना 

छत्रपती संभाजी नगर, प्रतिनिधी : कन्नड तालुक्यातील पिशोर येथे गुरुवारी दुपारी अचानक वीज पडल्याने तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन महिला व एक पुरुष जखमी झाले. पिशोर येथील वाघळखेडा शिवारातील गट क्रमांक ७१ मध्ये आज दि,१७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिशोर येथील  वाघूळखेडा शिवारातील गट क्र. ७१ मधील गुपित बाबा परिसरातील शेतात काही महिला व पुरुष मजूर काम आटोपून घरी परतत असताना अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्याचवेळी मजुरांच्या अंगावर थेट वीज कोसळली. या दुर्घटनेत हमीदा सय्यद हमीद (वय ४०), तस्लिम मुफ्तार सय्यद (वय ३९) व अलमिरा हनीफ सय्यद (वय १७) या तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेत तीन महिलांचा मृत्यू झाला, तर दोन महिला व एक पुरुष जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तीन जण गंभीर जखमी

या दुर्घटनेत हाफिज खलील सय्यद (वय २५), अनिसा निसार सय्यद (वय ३८) आणि फरजाना हमीद सय्यद (वय ३५) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सुरुवातीला पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच कन्नड तालुक्याच्या आमदार संजना ताई जाधव, तसेच तहसीलदार श्रीमती सरिका भगत यांनी पिशोर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांनीही रुग्णालयात भेट देऊन जखमींच्या उपचाराबाबत तसेच घटनेची माहिती संबंधितांकडून जाणून घेतली.

जखमींना मिळत असलेल्या उपचारांची पाहणी करून संबंधितांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यात आली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांप्रती आमदार संजनाताई जाधव यांनी दुःख व्यक्त केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मृत व जखमींच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने जी काही मदत करता येईल, ती सर्वतोपरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, अचानक आलेल्या पावसाच्या वेळी झाडाखाली आसरा घेतलेल्या नागरिकांवर वीज कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>