येवतीत घर फोडून चोरट्यांचा डल्ला; सोन्या-चांदीचे दागिने, रोकडसह ३ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल लंपास-Naldurg Police Station Crime News
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील येवती येथे अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोंडा उचकटून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, गृहउपयोगी साहित्य व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९९ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवती (ता. तुळजापूर) येथील रहिवासी महेश ज्ञानोबा भरगंडे (वय ४७) यांच्या राहत्या घरात ही चोरी झाली. दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.१० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने घराचा कडी-कोंडा उचकटून आत प्रवेश केला.
चोरट्याने घरातील कपाटाची तपासणी करून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने, गृहउपयोगी साहित्य तसेच रोख रक्कम असा एकूण ₹३,९९,१५० किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
घटनेनंतर महेश भरगंडे यांनी दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(५), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरीच्या घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.

0 Comments