धाराशिव जिल्हा क्राईम अपडेट : वाशी आणि शिराढोण पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचे दोन वेगळे गुन्हे दाखल-Dharashiv District Crime Update
धाराशिव (प्रतिनिधी) दि. 22 सप्टेंबर - धाराशिव जिल्ह्यातील वाशी आणि शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत लैंगिक अत्याचाराच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या असून दोन्ही प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
वाशी ,,,ल् ठाणे : फोटो डिलीट करण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार, दागिने लुटले
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 24 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिलेच्या तक्रारीनुसार, दि. 03.08.2026 रोजी सकाळी 10.30 ते दि.f x 16.09.2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत गावातील एका तरुणाने "तुझे माझ्याकडील फोटो डिलीट करतो" असा बहाणा करून तिला भाड्याने घेतलेल्या खोलीवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. तसेच दुसऱ्या एका तरुणाने देखील तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
याशिवाय एक महिला आणि दोन तरुणांनी संगनमत करून पीडितेच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी पीडितेने दि. 21.09.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून वाशी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 64(एम), 87, 308(2), 115(2), 352, 351(3), 127(2), 140(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास वाशी पोलीस करीत आहेत.
शिराढोण पोलीस ठाणे : 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
जिल्ह्यातील शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसऱ्या घटनेत एका गावातील 5 वर्षे एक महिन्याच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.
पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 20.09.2026 रोजी सायंकाळी 4.10 वाजण्याच्या सुमारास गावातील एका तरुणाने मुलीला त्याच्या राहत्या घराच्या गच्चीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
या प्रकरणी पिडीतेच्या आईने दि. 21.09.2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 64, 64(2) सह कलम 4(2), 12 बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (POCSO) 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींचा शोध पोलीस घेत असून अधिक तपास संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

0 Comments