/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> दुष्काळमुक्तीसाठी लोकसहभागातून ठोस उपाययोजना राबवाव्यात : ॲड. शीतल चव्हाण

Hot Posts

दुष्काळमुक्तीसाठी लोकसहभागातून ठोस उपाययोजना राबवाव्यात : ॲड. शीतल चव्हाण

दुष्काळमुक्तीसाठी लोकसहभागातून ठोस उपाययोजना राबवाव्यात : ॲड. शीतल चव्हाण


जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत 'बळीराजा आधार अभियानाची' मांडणी; जलसंधारण, शेतकरी व पशुधनाच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष

उमरगा, दि. ९ (प्रतिनिधी) : दुष्काळाचा सामना करण्यासाठी केवळ तात्पुरत्या मदतीवर अवलंबून न राहता लोकसहभाग, जलसंधारण, उपलब्ध जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि शेतकरी व पशुधनाला आधार देणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ॲड. शीतल चव्हाण यांनी केले.

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सेवाभावी संस्था व स्वयंसेवी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'बळीराजा आधार अभियान २०२६-२७' ची माहिती देऊन दुष्काळ निवारणासाठी विविध सूचना मांडण्यात आल्या.

या फाउंडेशनच्या वतीने दि. २ ऑक्टोबरपासून उमरगा व लोहारा तालुक्यांत लोकसहभागातून अभियान सुरू करण्यात आले असून, त्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची व आगामी नियोजित कामांची माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सिमेंट बंधारे व के. टी. वेअर्सची दुरुस्ती, विहिरी व बोअरवेलचे पुनर्भरण, जलतारा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, जनावरांसाठी चारा, भाकड जनावरांचा प्रश्न, शेतकऱ्यांना मदत व समुपदेशन, पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था आदी विषयांकडे लक्ष वेधण्यात आले.

तसेच पाझर तलावांतील संपादित जमिनींवरील अतिक्रमणे हटविणे, मनरेगाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेणे आणि सेवाभावी संस्थांच्या समन्वयातून दुष्काळ निवारणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

दुष्काळ ही केवळ शेतकऱ्यांची समस्या नसून संपूर्ण समाजासमोरील आव्हान आहे. त्यामुळे शासन, प्रशासन, सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याची भूमिका ॲड. चव्हाण यांनी मांडली.

या बैठकीस जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. फाउंडेशनच्या वतीने ॲड. शीतल चव्हाण यांच्यासह सत्यनारायण जाधव, व्यंकट भालेराव, किशोर औरादे, किशोर बसगुंडे व विजय चितली उपस्थित होते.

बैठकीतील चर्चा सकारात्मक व विधायक झाली असून, प्रशासन आणि सेवाभावी संस्थांच्या समन्वयातून दुष्काळ निवारणासाठी ठोस काम उभे राहील, अशी अपेक्षा फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>