/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> LCB चा पुन्हा ‘धमाका’! पवनचक्कीच्या तार चोरी टोळीचा पर्दाफाश; ११.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Hot Posts

LCB चा पुन्हा ‘धमाका’! पवनचक्कीच्या तार चोरी टोळीचा पर्दाफाश; ११.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

LCB चा पुन्हा ‘धमाका’! पवनचक्कीच्या तार चोरी टोळीचा पर्दाफाश; ११.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

येरमाळा, वाशी परिसरातील चोरीचे ४ गुन्हे उघडकीस; पाच जण ताब्यात, चोरीचा माल खरेदी करणाऱ्यावरही कारवाई

धाराशिव (प्रतिनिधी) : पवनचक्कीच्या नवीन विद्युत वाहिन्यांची अॅल्युमिनियम व तांब्याची तार चोरी करणाऱ्या टोळीचा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. मांडवा शिवारात केलेल्या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, चोरीच्या तारांसह पिकअप वाहन व दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत येरमाळा, वाशी परिसरातील पवनचक्की तार चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, मांडवा शिवारात शाम अजिनाथ शिंदे व त्याचे साथीदार येरमाळा व वाशी परिसरातील पवनचक्कीच्या ठिकाणांहून नवीन विद्युत वाहिनीची अॅल्युमिनियम तार चोरी करून पिकअप वाहनात भरत आहेत.

माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मांडवा शिवारात धाव घेतली. त्याठिकाणी एक पिकअप वाहन व दोन मोटारसायकली उभ्या असल्याचे तसेच सुमारे ८ ते १० जण पिकअपमध्ये तारांचे बंडल भरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस पथकाने पाठलाग करून त्यापैकी पाच जणांना शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये शाम अजिनाथ शिंदे (वय २६, रा. मांडवा), लाला गोविंद पवार (वय २४, रा. जुनी दूध डेअरी, धाराशिव, सध्या रा. मांडवा), आकाश श्रीरंग पवार (रा. वरुडा, ता. जि. धाराशिव), पवन कालीदास काळे (वय २२, रा. वरुडा, ता. जि. धाराशिव) आणि पिकअप चालक अंगद प्रल्हाद शिंदे (वय ३२, रा. घोसापुरी, ता. जि. बीड) यांचा समावेश आहे. याशिवाय घटनास्थळावरून पळून गेलेल्या अन्य चार जणांचीही नावे पोलिसांना समजली आहेत.

पोलिसांनी तारांबाबत चौकशी केली असता, आरोपींनी तेरखेडा, इंदापूर आणि ढोकी शिवारातील पवनचक्कीच्या नवीन पोलवरील विद्युत वाहिन्या कापून तार चोरी केल्याची माहिती दिली. पुढील चौकशीत आरोपी आकाश श्रीरंग पवार याने चोरीच्या मोठ्या प्रमाणातील तारा धाराशिव येथील जाकेर निजाम शेख याला विकल्याचे सांगितले.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव येथे जाकेर निजाम शेख याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आरोपींकडून चोरीच्या तारा खरेदी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईनंतर आरोपींना तसेच चोरीचा माल खरेदी करणाऱ्या व्यक्तीला येरमाळा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पोलिसांच्या तपासात पवनचक्कीच्या तार चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून तांब्याची तार, अॅल्युमिनियम तार, पिकअप वाहन आणि दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपी शाम अजिनाथ शिंदे हा नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात फरार आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या कारवाईमुळे पवनचक्की तार चोरीसोबतच अन्य गुन्ह्यांच्या तपासालाही महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे.


ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटके तसेच पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, क्यूआरटी पथकातील आदित्य बालवाड, रितेश चारले, महेश खरात, चापोह महेबुब अरब, सुभाष चौरे, रोहित दंडनाईक व प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>