नाईचाकूर येथे बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या पणत्या खरेदीला नागरिकांचा कल
नाईचाकुर/ बालाघाट न्युज टाइम्स:दसरा संपली की वेध लागते ते दिवाळी सणाचे, अवघ्या चार दिवसांवर दिवाळी सण असून बाजारामध्ये निरनिराळे आकाश कंदील, पणत्या, फटाके ,सुगंधी उटणे, विद्युत रोषणाईच्या तोरणाने बाजारपेठा सजले आहेत. मात्र उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील महिला बचत गटातील कुंभार समाजातील महिलांनी पारंपारिक मातीच्या पणत्या बनवून गावामध्ये स्टॉल उभारला आहे, त्या पणत्या खरेदी करण्यासाठी गावातील सर्वच महिला बचत गटाच्या महिला गर्दी करत आहेत,आजच्या आधुनिक डिजिटलच्या युगात पारंपारिक मातीच्या पणत्या खरेदी करण्यासाठी नागरिकांचा कल कमी होत चाललेला आहे परंतु नाईचाकूर येथील महिलांनी पारंपारिक मातीच्या पणत्या खरेदीला पसंती दर्शवून आपल्याच गावातील महिलांचा व्यवसाय वाढीसाठी छोटासा प्रयत्न केला आहे.यावेळी कृषी व्यवस्थापक सचिन सोनवणे सीआरपी मुक्ता हिंडोळे नंदा नागणे सुनीता लकडे सीआरपी यशोदा पवार ग्राम संघाचे अध्यक्ष बेबी सरोजा जाधव सचिव सुनंदा बागुले कोषाध्यक्ष मीनाक्षी पवार व महादेव कुत्रोबा ग्राम संघाच्या बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत.
0 Comments