Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना :पिठाच्या गिरणीत ओढणी अडकून महिलेचा जागीच मृत्यू

 दुर्दैवी घटना :पिठाच्या गिरणीत ओढणी अडकून महिलेचा जागीच मृत्यू


लातुर: पिठाच्या गिरणीत ओढणी अडकून गिरणी चालक महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना लातूर शहरातील  होळकर नगर भागात शनिवारी दि,(२५) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अश्विनी बालाजी ढोपरे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, होळकर नगर येथील रहिवासी असलेल्या अश्विनी बालाजी ढोपरे वय (३१) रा. होळकर नगर आर्वी लातूर या एमआयटी कॉलेजमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या, तसेच त्या कामाच्या फावल्या वेळात घरच्या घरी गृह उद्योग म्हणून पिठाची गिरणी चालवत होत्या, मयत अश्विनी ढोपरे या शनिवारी सायंकाळी या पिठाच्या गिरणीत दळण टाकत असताना गळ्यातील ओढणी गिरणीच्या पट्ट्यात अडकली आणि क्षणार्धात त्यांचा गळ्याला करकचून फास बसला आणि त्या जागीच ठार झाल्या या दुर्घटनेमुळे लातूर शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

याबाबत एमआयडीसी हॉस्पिटलचे डॉ. महेश चंद्रकांत भुजंगे यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसात आकस्मित मृत्यूची (आ. मृ.नं.38/23 कलम 174 सीआरपीसी ) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments