जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती विशेष
=======================
आज पासुन ९०० वर्षापुर्वी जगात पहिल्यांदा प्रथम लोकशाहीची स्थापना करणारे संत म्हणजे महात्मा बसवेश्वर होय.म्हणुन बसवेश्वर हे संसदिय लोकशाहीचे जनक मानले जातात.बसवेश्वर यांचा जन्म सन ११०५ रोजी कर्नाटक राज्यातील विजापुर जिल्ह्यातील बागेवाडी येथे झाला.त्यावेळेस ते ज्या विरशैव म्हणजे वाणी जातीत जन्मले होते,त्या काळी समाजात अंधाधुंदी,अंधश्रध्दा,पुजापाठ,कर्मकांड मोठ्या प्रमाणात होता.बहुजन मागास खालच्या शुद्र वर्ण लोकांना शिक्षण ज्ञान घेण्याचा अधिकार नव्हता.राजसत्ता ही धर्मसत्तेनुसार चालत होती.राज्यव्यवस्थेवर धर्माचा अनिष्ठ चालीरिती रिवाजा जबरदस्त पगडा होता.त्याकाळी साधी सोपी सहज धर्माची मांडणी करुन धर्माला नवचैतन्य देणारे संत बसवेश्वर महान प्रबोधनकार म्हणायला हवेत.
चार्तुवर्ण व्यवस्था नाकारली÷
संत बसवेश्वरांनी चार्तुयवर्ण व्यवस्था नाकारली.ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य,शुद्र ही व्यवस्था असु शकत नाही.माणुस जन्माने शुद्र नव्हे तर कर्माने ठरेल .कर्मावर तो ब्राह्मण ठरेल.त्याला कमी लेखु नका.मानवात स्रीव पुरुष केवळ दोन जाती आहेत.त्यामुळे चार्तुवर्ण व्यवस्था नाकारण्याचे बसवेश्वरांनी ठरवले.ते सिध्द करुन दाखवले.हे करताना त्यांना जात बहिष्कृत केले गेले.त्यांना त्रास दिला गेला.सनातनी कर्मठ व्यवस्थेने त्यांच्यावर हल्ले केले.तरी ही ते डगमगले नाहीत,
अंधश्रध्दा व कर्मकांडला विरोध÷ त्या काळी मंदिर,पुजापाठ,अभिषैक,पशुबळी,अजाबळी,वेदांना महत्व ,ब्राह्मणी व्यवस्था,या कर्मकांडाला त्यांनी विरोध केला.समता प्रस्थापित करतो तो धर्म ही धर्माची साधी व्याख्या केली.जो सर्वांना समावुन घेतो तै धर्म.जो सर्वांना समान मानतो तो धर्म .म्हणुन पुजापाठ,वेदाध्ययन ,होमहवन,कर्मकांड,पुजा,मठव्यवस्था,आचार्य,जंगम,मठाधिपती यांची दादागीरी मोडुन काढली.शिवमंदिर सर्व बहुजनांना खुली केली.मठ,मठाधिपती,शंकार्चाय,लिंगस्वामी यांची दादागिरी,यांचे देव सामान्य लोकांतील मध्यस्ती त्यांना मान्य नव्हती.सर्वांना मठात,मंदिरात,शिवमंदिरात त्यांनी प्रवेश दिला.
त्या काळी दक्षिणेत विशेषता कर्नाटक धारवाड,आंध्र,तेलंगणा,तामिळ प्रांतात धर्माची व धर्माच्या नावाने भेदभाव प्रचंड जातीयता,कर्मकांड जातीय उतरंड होती .ही उतरंड मोडायची असेल तर समता व समानता देणारा धर्म असायला हवा म्हणुन त्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली.ज्यात त्यांनी साळी ,माळी ,बोगार(कासार),तेली,सुतार,लोहार,चांभार,कुंभार,धनगर,वाणी,कोष्टी,जंगम,धनिया,वैश्य अशा सर्व जातीनां प्रवेश दिला.त्या सर्वांना एकाच लिंगायत पंथाखाली आणले.त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार ला मान्यता दिली.पुढे हा पंथ धर्म म्हणुन पुढे आला.शिवमंदिरात सर्वांना प्रवेश,कपाळावर तीन पट्टे विभुती,गळ्यात रुद्राक्ष व लिंग धारण करणे,शिवआराधना करणे,सर्वांना प्रेम देणे,दान धर्म करणे,भुकेल्यास अन्नदान करणे,पाणी दान,चारा औषधदान ही संकल्पना रुजवली.मुळात या सर्व जाती लिंगायत या धर्माखाली एकत्र आले.त्यामुळे आपोआपच समता,समानता आली.रोटीबेटी व्यवहार होवु लागले.लिंगायत हाच सर्वश्रेष्ठ धर्म झाला.त्यामुळे जातीयता,धार्मिकता नष्ठ झाली.पण दुर्देव भगवान महावीर ,भगवान बौध्द यांच्यानंतर जसे जैन व बौध्दांत परत कर्मकांड आले तसेच लिंगायत धर्मात ही बसवेश्वरांनंतर लिंगायत कासार,लिंगायत वाणी,लिं.कुंभार अशा जाती प्रखर होत गेल्या.रोटीबेटी व्यवहार परत जातीअंर्गत होवु लागले.उदा.जसे लिंगायत कुंभार मुलगा,लिंगायत कुंभार समाजाचीच मुलगी करु लागला.सोवळ,पुजापाठ,कर्मकांड,भेदभाव,उच्चनिचता परत लिंगापत पंथात ही आली.हे दुर्देवाने म्हणावे लागेल.महापुरुषांच्या विचारांचा पराभव त्यांचेच अनुयायी करतात हा इतिहास येथे ही संत बसवेश्वरांच्या बाबतीत लागु झाला.
संत बसवेश्वरांनी महिलांना ही चळवळीत समाविष्ट केले.महिलांवरील अन्यायाला वाचा फोडली.पडदा पध्दतीला विरोध्द केला.स्रीयांनी डोक्यावर पदर घ्यावा असे काही नाही.पडद्यामध्ये स्रीलि ठेवुन भेदभाव वाढत जाणार,ती स्वतंत्र आहे त्यामुळे स्रीस्वातंत्र्याची संकल्पना त्यांनी रुजवली.विधवांचे पुर्नविवाह केले.त्यांना सन्माने जगण्याचा मार्ग दाखविला.मासिक पाळी हा विटाळ नाही तो निसर्गधर्म आहे.स्री या काळात उलट अधिक सशक्त होईल या कडे लक्ष द्या,त्याला विटाळ न मानता नवनिर्मिती साठी ती निसर्गाने दिलेले तिला वरदान आहे असा वैज्ञानिक दृष्टीकोन त्यांनी रुजवला.सतीप्रथेला विरोध केला.विधवा स्रिच्या केशवपणाला त्यांनी विरोध केला.मंदिर,मठात स्रीयांना प्रवेश दिला.ज्ञान,धर्मग्रंथाचे अध्ययन करण्याचा अधिकार त्यांनी स्रीयांना दिला.
आंतरजातीय विवाहास मान्यता÷ आतंरजातीय ,आंतर धर्मिय विवाहास संत बसवेश्वरांनी मान्यता दिली.त्यासाठी त्यांनी स्वःता मागास जातीतील संत त्यांचा मुलगा शिलवंत याचा विवाह ब्राह्मण कन्या बसवंतीशी लावुन दिला.त्याकाळी ही खुप मोठी क्रांती होती.त्यामुळे त्यांच्यावर प्राणघात हल्ले झाले.पण त्यांनी समाजाला समता समानता आणण्यासाठी लिंगायत आंतरजातीय विवाह कसे व्हायला हवे हे कृतीतुन दाखवुन दिले
पना त्र्षापनिरपेक्षता,स्वातंत्र्य,बंधुता ही तत्वे त्यांनी स्वःता अमलात आणली.अनुभव मंटप ही संस्था स्थापन करुन लोकांच्या समस्या,न्याय,हक्क यांची चर्चा केली जात असे.त्यांच्या अन्यायाला वाचा अनुभव मंटप मधुन फोडली जात.संत बसवेश्वरांनी संसदिय लोकशाही प्रणाली बाराव्या शतकात जगाला दिलि,त्यामुळे संसदिय लोकशाहीचे चे जनक ठरतात.संत बसवेश्वर हे लोकशाहीचे आद्य प्रवर्तक आहेत.
विद्रोही लेखक,कवी व साहित्यीक संत बसवेश्वर÷
सुमारे ९०० वर्षापुर्वी समाजाची ही मांडणी करणारे संत बसवेश्वर समाजासाठी,धर्मव्यवस्थेसाठी विद्रोही ठरले.पण तरीही ते डगमगले नाहीत.त्यांनी प्रबोधनासाठी लेखन चालु ठेवले.कन्नड भाषेतुन त्यांनी लेखन केले.याला "संत बसवेश्वरांची वचने" म्हणुन ती प्रसिध्द आहेत.मराठीत ही सध्या त्यांचे अनुवाद पाहयला मिळतात.कविता,काव्य,लेखन,विपुल ग्रंथ लेखन करुन त्यांनी प्रबोधनाची चळवळ सुरु ठेवली.संस्कृत भाषेचा वापर न करता त्यांना जनसामान्याची कन्नड,तेलगु,मराठी भाषा वापरुन लोकांना प्रभावित केले.
भदभाव,अंधश्रध्दा,कर्मकांड,अज्ञान समाजास लागली किड असताना,सनातनी कर्मठ लोक,मठ मठांधिपती,शंकाराचार्य त्यांची धार्मिक व्यवस्था याला पहिल्यांदा संत बसवेश्वरांनी सुरुंग लागला.ही उतरंड त्यांना मान्य नव्हती.म्हणुन समतावादी समाज निर्माण करणारे ते विश्वनायक समातानायक होते.
अशा समतानायक,विश्ववंदनिय,जगतगुरु,लोकशाहीचे आद्य प्रवर्तक तथा जनक संत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी नमन!
=======================
©
श्री.पंकज रा.कासार काटकर
सहशिक्षक
जि.प.प्रा.शाळा काटी.
मु.पो.काटी.ता.तुळजापुर
जि.उस्मानाबाद
मो.नं.-९७६४५६१८८१
0 Comments