Hot Posts

6/recent/ticker-posts

दिव्यांना राजकीय आरक्षण दया प्रहार संघटनेची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी| Daya Prahar organization demands political reservation for Divyas from BJP state president Chandrashekhar Bawankule

दिव्यांना राजकीय आरक्षण द्या या मागणीसाठी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


 धाराशिव : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे हे धाराशिव जिल्हाच्या दौर्यावर आले असता प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा बच्चू भाऊ कडू  यांच्या जीवनावर आधारित लोकनायक हे पुस्तक देऊन स्वागत केले तसेच प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना समाजात न्याय मिळण्याकरिता व त्यांचे हक्क व प्रश्न हे शासन दरबारी मंडण्याकरिता दिव्यांग व्यक्तींना देशाच्या राजकारणात आरक्षण देण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी ज्या प्रमाणे सर्व जाती ,समूहांना राजकारणात आरक्षण लागू आहे त्याच प्रमाणे कायद्याच्या नियमानुसार दिव्यांगांना देखील राजकारणात मतदारसंघ तयार करावा जेणेकरून दिव्यांगाना त्यांच्या न्याय, हक्क,मागण्या या राजकीय व्यसपीटावर व सभागृहात मांडता येतील अशा विषयाचे निवेदन प्रहारच्या वतीने देण्यात आले यावे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयाचे स्वागत करून लवकरच हा विषयावर आपण विचार करून निर्णय घेऊ असे आश्वासन देखील दिले आणि प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या मागणीचे देखील कौतुक केले दिलेल्या निवेदनामुळे  मयुर काकडे यांचे राज्यभरातून दिव्यांग व्यक्तीमध्ये देखील कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments