Hot Posts

6/recent/ticker-posts

बेदाण्याचे दर गडगडल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत|Raisin prices plunged grape growers in trouble

 बेदाण्याचे  दर गडगडल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी  अडचणीत



तुळजापुर /राजगुरु साखरे : बाजारात द्राक्षाला भाव मिळत नसल्याने तुळजापूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीकडे कल वाढवला आहे, परिणामी बेदाण्यालाही मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खूपच कमी भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चाच्या तुलनेत हाती काहीच उरत नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादकक्ष शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अलीकडे तालुक्यातील चिवरी, जळकोटवाडी, आरळी ,अपसिंगा, तामलवाडी ,काटी,मुरटा,मानमोडी आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते, सध्या बेदाण्याची आवक जास्त आणि मागणी कमी असल्यामुळे सौदा झाल्यानंतरही व्यापारी माल उचलायला तयार नाहीत. आता बेदाण्याची आवक वाढल्याने बाजारात १०० ते १२० भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी माल सोडायला तयार नाहीत. एकंदरीत हवामानाच्या लहरीपणामुळे व शेतीमालाचे गडगडले दर यामुळे शेतकरी नेहमी अडचणी सापडत आहे. द्राक्ष बागेच्या संगोपनासाठी लाखो रुपये खर्च करून  खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Post a Comment

0 Comments