शेतकऱ्यांनी मका पिकांकडे फिरवली पाठ, तालुक्यात अमेरिकन लष्करी अळींचा प्रादुर्भावामुळे उत्पादन घटले !
तुळजापुर : तुळजापूर तालुक्यातील शेतकरी सोयाबीन उडीद तुर गहू ज्वारी हरभरा या पिकाबरोबर मका पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते मात्र मागील दोन वर्षापासून अमेरिकन लष्कर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसत आहे ही अळी मका पीक पूर्ण फस्त करते यामुळे मक्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व उत्पादनात मोठी घट येते.
यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित व हमखास उत्पादन मिळेल याची शाश्वती उरलेली नाही, परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मका पिकाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. या पिकाच्या क्षेत्रात घट होत आहे, या मका पिकाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी घास गवताची लागवड करत आहेत.
मका हे पीक खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतली जाते, उसात ,भुईमुगात, आंतरपीक म्हणूनही घेतली जाते, पावसाळा संपल्यानंतर रब्बी हंगामातील थंड वातावरण मक्याच्या वाढीसाठी अनुकूल असते, पण अलीकडे मक्याच्या सुधारित वाणाचे बियाणे बाजारात उपलब्ध झाली आहेत. तालुक्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अलीकडे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत आहेत , जनावरांना चारा म्हणून मका पिकाचा प्रामुख्याने वापर केला जातो तसेच अनेक जण आहारात मक्याच्या भाकरीचाही वापर केला जातो.
उसाची तोडणी केल्यानंतर उसात आंतरपीक म्हणून किंवा खोडवा पीक काढून शेतकरी मक्याची लागवड करतात गळीत हंगाम संपल्यावर जनावरांना आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हिरव्या चाऱ्याची चणचण भासतअसते, अशावेळी मका उत्पादक शेतकरी जनावरांना चारा म्हणून मक्याची चढ्या भावाने विक्री करून नफा मिळतात. अलीकडे दोन वर्षात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे ही अळी महागड्या कीटकनाशक फवारणीही सहजासहजी दाद देत नाही यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठी घट येत आहे, यामुळे गतवर्षीच्या तुलनेत मका पिकाचे क्षेत्र तालुक्यात घटले मका आहे.मका पिकाला पर्याय म्हणून तालुक्यातील शेतकरी वेगवेगळ्या जातीचे गवत लागवड, ज्वारी बाजरी या पिकाकडे वळला असल्याचे चित्र दिसत आहे.
मी जनावरांना चारा म्हणून मक्याचे पीक घेत होतो पण मागील दोन वर्षापासून मकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे घास गवताची लागवड करत आहे , लष्करी अळी पूर्णपणे पिकाची पाणी खाऊन टाकते, या घास गवत लागवड केल्याने जनावरांना उत्तम चारा मिळत आहे.
बालाजी गिराम ,शेतकरी
0 Comments