दुर्दैवी घटना : लग्नानंतर देवदर्शनाला जाताना नवदांपत्याच्या गाडीला भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू बार्शी तालुक्यातील घटना-Solapur-Barshi-Pangari Accident News

Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना : लग्नानंतर देवदर्शनाला जाताना नवदांपत्याच्या गाडीला भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू बार्शी तालुक्यातील घटना-Solapur-Barshi-Pangari Accident News

दुर्दैवी घटना : लग्नानंतर देवदर्शनाला जाताना नवदांपत्याच्या गाडीला भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू बार्शी तालुक्यातील घटना-


सोलापूर : लग्नकार्यानंतर नवदांपत्य नातेवाईकांसह गाडी घेऊन तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर रविवारी दि, 30 रोजी बार्शी तालुक्यातील घारीनजीक काळाने घाला घातला आहे. रविवारी सायंकाळी अंदाजे साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान बार्शी ते पांगरी रोडवरील घारी शिवारातील जांभळबेट ओढ्याजवळ एक भीषण अपघात झाला या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. महिंद्रा एक्स यु व्ही (mh - 46 एक्स 77 78) व मालवाहतूक ट्रक mh-20 CT 8689 यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत 5 जणांचा मृत्यू झाला (Barshi Accident)असून दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेबाबत मिळालेले अधिक माहिती अशी की, नवविवाहित दांपत्य अनिकेत व मेघना अनिकेत कांबळे यांचे चार दिवसापूर्वी लग्न झाले या लग्नानंतर तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी ते कुटुंबियासहित रविवारी दि,३० रोजी बार्शी ते पांगरी मार्गे (Barshi-Pangari)निघाले असता या मार्गावरील घारी या गावाजवळ त्यांच्या महिंद्रा कार व मालवाहतूक ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली यामध्ये नवरदेवाचे आई-वडिलांसह(Mother&Father Died) पाच जणांचा जागेच मृत्यू झाला नवविवाहित दांपत्ते ही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल (Jagdalemama Hospital Barshi)येथे उपचार सुरू आहेत .या अपघातात अनिकेत यांचे आई वडील संजय तुकाराम वाघमारे वय (48) व सारिका संजय वाघमारे वय (45) राहणार दोघे (रा. कुर्डवाडी) तसेच जयश्री गौतम कांबळे, व गौतम भगवान कांबळे वय 58 (दोघे राहणार पनवेल) रीता धर्मेंद्र कांबळे वय 43 (रा. विजयपूर कर्नाटक-Karantaka) यांचा जागीच मृत्यू झाला तर नवविवाहित दांपत्य अनिकेत व मेघना कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघात घटनेची माहिती मिळताच पोलीस उपभागीय अधिकारी (Dysp)अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर ,पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर ,पोलीस संजय सातपुते ,राहुल आलाट, राम शिंदे यांनी अपघातस्थळी भेट दिली. यावेळी अपघात स्थळी पोलीस प्रशासनाला परिसरातील नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. या दुर्दैवी घटनेमुळे पांगरी परिसरात तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments