महिला वनरक्षक कर्मचाऱ्यास धक्काबुक्की, आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 21 हजार रुपयांचा दंड , धाराशिव प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-
धाराशिव प्रतिनिधी /रुपेश डोलारे : शासकीय कामात कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून त्यांच्या शासकीय कामात अडथळा करणाऱ्या तसेच महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या आरोपी दत्ता मोहन तुपे (रा. येडशी तालुका धाराशिव) यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरवत पाच वर्षे सक्त मजुरी व 21 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे .याबाबत दिनांक 20 नोव्हेंबर रोजी हा निकाल देण्यात आला आहे.
याबाबत जिल्हा सरकारी अभियोक्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला ही येडशी येथील वन विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहे दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्या रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्य कार्यालयात शासकीय कर्तव्यावर असताना आरोपी दत्ता मोहन तुपे हा तेथे आला. यावेळी आरोपीने आवश्यक माहिती नियमाप्रमाणे फिर्यादीच्या वरिष्ठाकडे मागणी ऐवजी फिर्यादीवर राजकीय दबाव टाकून त्याच्याशी हुजत घालून लागला ,फिर्यादीस लज्जा वाटेल असे बोलू लागला. यावेळी आरोपींनी फिर्यादीस धक्काबुक्की करून अंगावर धावून जात शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक आर. एस गायकवाड यांनी तपास करून दोषारोपपत्र पत्र न्यायालयात सादर केली होती. यावेळी सुनावणी दरम्यान सरकार पक्षाकडून चार साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए.डी देव यांच्यासमोर झाली .यावेळी समोर आलेला साक्षी पुरावा तसेच जिल्हा शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी दत्ता मोहन तुपे यास पाच वर्षे सक्त मजूरची शिक्षा व २१ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे यावेळी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल श्री कुंभार यांनी काम पाहिले.

0 Comments