बीडच्या उपसरपंच आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाडची आर्थिक व्यावसायिक व्यवहाराच्या पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा-
सोलापूर/प्रतिनिधी रूपेश डोलारे: लोकनाट्य कला केंद्रामध्ये काम करणारी नर्तिकीच्या नादाला लागून स्वतःला गोळी मारून घेत आत्महत्या करणाऱ्या बीडचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणातील संशयित आरोपी पूजा गायकवाड हिच्या तपासासाठी मिळालेली पोलीस कोठडीची मदत संपली असून आज पुन्हा पुढील तपासण्यासाठी बार्शीच्या न्यायालयामध्ये तिला हजर करण्यात येणार आहे दरम्यान घटनेच्या तिसऱ्या दिवशी तपासाच्या दृष्टीने घडामोडी घडले आहेत.
या घटनेबाबत वैराग पोलिसांकडून पूजा गायकवाड ची कसून चौकशी सुरू आहे या चौकशीमध्ये तिच्या मोबाईल सह गोविंदाचा मोबाईल देखील पडताळला जात आहे जप्त केलेल्या दोघांच्याही मोबाईल मध्ये जिथे संशयास्पद संपर्क असल्याचे येत आहे तिथे पोलिसांनी प्रत्येक व्यक्तीला पाचरण करून चौकशी सुरू केली आहे पोलिसांनी पूजा गायकवाड ही आर्थिक व्यवहार आणि तिची व्यवसायिक संबंध पडताळल्यास सुरुवात केली आहे या प्रकरणी गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये तिचा संपर्क कुठे कुठे आला आणि तिने काय काय खरेदी केले याबाबतची सखोल चौकशी सुरू आहे विशेष म्हणजे ज्या आर्थिक बाबी गेल्या तीन दिवसापासून चर्चेत होत्या त्यातील काही काही बाबी खोट्या पोलीस तपासात उघड झाली आहे.
शुक्रवारी अहिल्यानगर येथील जामखेड, धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव आणि संभाजी नगर जिल्ह्यातील आढळून ये शाखेत अनेक ठिकाणी असलेल्या लोकनाट्य कला केंद्रातील केंद्र चालकांना चौकशीसाठी वैराग पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात आले होते पूजा गायकवाड हिच्या मैत्रिणी देखील चौकशीसाठी बोलवण्यात आले होते या चौकशीमध्ये अनेक बाबी उघडकीस येण्याच्या शक्यता आहे. दरम्यानची आर्थिक व्यवहार झालेले आहेत या आर्थिक व्यवहारांमध्ये ज्या व्यक्तीचा समावेश आहे ज्यांनी खरेदी विक्री व्यवहारांमध्ये सहभाग घेतलेला आहे अशा अनेक व्यक्तींना चौकशीसाठी वैराग पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात आले होते विशेष म्हणजे काही संशयास्पद हालचाली देखील पोलिसांना आढळून आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. घटनेच्या रात्री पूजा गायकवाड कुठे होती या संदर्भात अनेक तर्क वितर्क होते मात्र वैराग पोलिसांनी पारगाव येथील लोककला नाट्य कला केंद्रात असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली असता तिथे असल्याचे आढळून आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
वैराग मानेगाव हद्दीमध्ये पूजा गायकवाड यांनी खरेदी केलेल्या खुल्या प्लॉटमध्ये साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे यांचे नाव आढळून आले आहे. 21 जानेवारी 2025 रोजी वैरागच्या दुय्यम निबंध कार्यालयामध्ये प्लॉटचा व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे त्यामुळे या आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांचा समावेश असल्याचे सिद्ध होत आहे दरम्यान चौकशीमध्ये पूजा गायकवाडच्या भावाकडे असलेली बुलेट ही तीन वर्षांपूर्वी खरेदी केली असून त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे .याशिवाय घरामध्ये जी जनावरे भावाने घेतलेली आहेत ती देखील त्यांनी स्वतः घेतलेली असून यामध्ये महेश गोविंद बर्गेचा काहीही संबंध असल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे पूजा गायकवाडचा भाऊ प्रशांतने आपली बहीण पूजाकडे म्हैस घेण्यासाठी पैसे मागितले होते मात्र पैसे नसल्याने तिने स्पष्ट सांगितल्याचे पुरावे पोलिसाकडे उपलब्ध झाली आहेत एकंदरीत या घटनेचा सखोल तपास सुरू असून पुढे कोणत्या घडामोडी घडणार याकडे पाहावी लागणार आहे .

0 Comments