भीषण अपघात : तामलवाडीजवळ टोल गेटच्या लोखंडी खांबाला कार धडकुन दोन जण जागीच ठार; तर दोघे गंभीर जखमी सोलापूर -धाराशिव महामार्गावरील घटना-Solapur-Dharashiv Toll gate Tamalwadi Accident

Hot Posts

6/recent/ticker-posts

भीषण अपघात : तामलवाडीजवळ टोल गेटच्या लोखंडी खांबाला कार धडकुन दोन जण जागीच ठार; तर दोघे गंभीर जखमी सोलापूर -धाराशिव महामार्गावरील घटना-Solapur-Dharashiv Toll gate Tamalwadi Accident

भीषण अपघात : तामलवाडीजवळ टोल गेटच्या लोखंडी खांबाला कार धडकुन दोन जण जागीच ठार; तर दोघे गंभीर जखमी सोलापूर -धाराशिव महामार्गावरील घटना- 


धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी जवळ बालाजी अमाईन्स कंपनी जवळ असलेल्या लोखंडी खांबावर कार धडकून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 2 डिसेंबर रोजी रात्री घडली आहे.याप्रकरणी या घटनेची तामलवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर धाराशिव महामार्गावरील तामलवाडी तालुका तुळजापूर येथील बालाजी अमाईन्स कंपनी जवळ असलेल्या  लोखंडी खांबावर कार धडकून झालेल्या भीषण अपघातात भारत शंकर विटकर वय (55) व सुधाकर विलास गिरे वय (50) दोघे (रा. मार्डी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर )यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले ही घटना मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. विजय नागेश मोरे वय (25) व प्रकाश तानाजी गरड वय (24) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

या जखमी दोघांनाही सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आली आहे हे चौघेही मार्डी तालुका उत्तर सोलापूर या गावचे रहिवाशी असून एकाच वेळी दोघे ठार झाल्याची वार्ता कळताच मार्डी गावावर शोककळा  पसरली आहे .या घटनेची माहिती तामलवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून या घटनेची हकीगत अशी की भारत विटकर सुधाकर गिरे ,विजय मोरे ,प्रकाश गरड हे चौघे गाडीने खाजगी कामानिमित्त तुळजापूरला गेले होते रात्री दीडच्या सुमारास बालाजी अमायन्स जवळ असलेल्या टोलचे अंतर दर्शविणाऱ्या फलकाच्या लोखंडी खांबावर कार जोरदार आदळली कार इतकी वेगात होती की अर्ध्यापर्यंत कार फाटली त्यात भारत विटकर व सुधाकर गिरे हे दोघेजण जागीच ठार झाले तर विजय मोरे यांनी प्रकाश गरड हे गंभीर जखमी झाले या घटनेचा तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ ठाकूर हे पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments