धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओम राजे निंबाळकर व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ढेकरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
धाराशिव प्रतिनिधी: जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओम राजे निंबाळकर व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना ढेकरी तालुका तुळजापूर येथील समाधान ढवळे यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेतील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप धाराशिव जिल्हा शिवसेना सह संपर्कप्रमुख नंदूराजे निंबाळकर यांच्या हस्ते व शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर सरदार सिंग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले .
यावेळी विभाग प्रमुख बालाजी पांचाळ सिद्धराम कारभारी सरपंच तेजस माने अमोल गवळी गुणवंत देशमुख बालाजी शेंडगे शिवाजी रोडे ओम देशमुख बापू रोडे राजकुमार पाटील आनंद जाधव रमेश भालेकर यांच्यासह शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments