केल्याने होत आहे रे! आधी केलीचे पाहिजे !! माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्याची यशोगाथा
शब्दांकन - श्री सतीश कुडलिक कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते
राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत शेततळे अस्तरीकरण / आच्छादनाचे अर्थसहाय्याने अवर्षन प्रवन क्षेत्र मधील बळीराजा स्वयंनिर्भर व समृद्ध ची यशोगाथा मध्ये मौजे पिपरी येथील आजिनाथ शिवाजी कर्चे यांची इतर शेतकरी यांना प्रोत्साहन देणारी आहे. अजिनाथ शिवाजी कर्चे रा. पिपरी शंभो महादेव डोंगर रागाच्या पायथ्याला मध्यम ते हलकी जमिन पिढ्यान पिढ्या शेती व शेतीवर आधारीत शेती व्यवसायवर उद्रनिवीह अवलंबून होता व आहे .
अवर्षन प्रवन क्षेत्र व अशाश्वत प्रर्जन्यमान मुळे खरिप हाताला आला तर आला नाहीतर रब्बी हंगावर सर्व अवलंबून आसलेले शेती उत्पन्न व त्यावर जगण्याचा ताळमेळ कसातरी बसायचा व शेवटी हरभारे खाल्ले व हात कोरडे अशी परिस्थिती पाचवीला पुजलेली . महाराष्ट्र शासन कृषि विभाग मंडळ कृषि अधिकारी व कर्मचारी पिपरी येथे एका शेतकरी प्रशिक्षणात भेट झाली व त्यावेळी परिस्थितीचे कथन केल्यानतर उपलब्ध साधन सामुग्री परिस्थिती वर मात करून उभारी घेणेसाठी उपलब्ध पावसाचे पाणी जे वाहून जाते व पावसाळ्यात उपलब्ध होणारे विहीर बोअर चे पाणी साठविणेसाठी मागेल त्याला शेततळे मधून केलेल्या शेततळे खोदाईला पाणी साठवन करणेसाठी महाडीबीटी मधून प्लॅस्टीक अस्तरीकरणाला अर्ज करून शासनाच्या अनुदानाचा लाभ घेणेबाबत सल्ला देण्यात आला या आधारे महाडीबीटी वरील अर्जाची निवड होऊन विहीत कागदपत्रे अपलोड अंती पूर्वसमती ने प्लॅस्टीक आच्छादन पेपर खरेदी करून बसविण्यात आला .
कृषी सेवक लालासाहेब माने यांचा पाठपुरावा व कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी यांनी तत्काळ मोका तपासणीअती प्लॉस्टीक अच्छादन ५० हजार आनुदान डीबीटीने जमा झाले . यशची पहिली पायरी चढलो शाश्वत संरक्षीत पाण्याची सोय झाली . पूर्वापार भाजीपाला पिकविणे गावगावच्या आठवडी बाजारात विक्री करण्याचा पहिला व्यवसाय होताच त्यामुळे मध्यस्त आडत दलाल ह्याचे कमीशन , शेस ची बचत होत होती त्याचा फायदा झाला . उन्हाळी हंगाम मध्ये शाश्वत पाणी व्यवस्थापन मुळे उन्हाळी टोमॅटो लागवड करावयाचे ठरले . कृषि विभाग सल्ल्याने उन्हाळी हंगामसाठी सिजेन्टा - ५७५ टी या जातीच्या ४ हजार रोपाची नोंदणी रोपवाटिकेकडे केली . दरम्यानचे काळात सेंद्रीय, कंपोस्ट खते जवळपास ४ ट्रेलर २०हजार जमिनीत मिसळून घेतले व ३फुट रुंदीसह . १०० फुट लांबीचे गादी वाफे तयार करून त्यामध्ये अमोनिअम सल्फेट १पोते, सिगल सुपर फॉस्फेट २ पोती व सल्फेट ऑफ पोटॅश -१ पोते गादीवाफ्यावर मिसळून घेतले व इनलाईन ठिंबक सिंचन साठी साडेसात हजार खर्च करून संच कार्यान्वीत केला . नोदणी केलीली ४हजार रोपे प्रति रोप रु २.३० प्रमाणे जागेवर प्राप्त झाली त्याचा लागवड १.५ फुटावर एप्रिल पाड व्याच्या मुर्हूतावर केली .
बांबुच्या कैच्या व सुतळी च्या सहयाने मांडव तयार करण्यात येऊन झाडाला आधार देण्यात आला. गरजेनुसार सुक्ष्म अन्नद्रव्ये २ हजार व रा. खते बेसल डोससह १०हजार खर्च झाला . किटकनाशके व रोगनाशके व पहजार खर्च करण्यात आला .माहे जून पहिल्या आठवड्यात टोमॅटो फळे विक्रीला उपलब्ध झाली . टोमॅटो ची काढणी दररोज आठवडा बाजार अकलुज ,नातेपुते , सदाशिवनगर फलटण व नातेपुते मंडईत करून प्रति किलो ५० रु ते ९० रु भाव मिळाला. अधिकचे होणारे टोमॅटो २ ते ३ दिवसाआड घाऊक बाजारात विकून प्रती कॅरेट १२ शे ते १८ शे भाव मिळाला . अशाप्रकारे १८ जुलै अखेर ७०० शे कॅरेट १५ टन टोमॅटो उत्पादन झाले सर्वसाधारण पणे प्रति झाड ३ .५ ते ४ किलो उत्पादन आले . टोमॅटो ०.२० हे क्षेत्राला सर्व खर्च - ६ ५ हजार पर्यत येऊन सर्व खर्च वजा जाता ५.१५ लाखाचे निव्वळ उत्पन प्राप्त झाले .
टोमॅटो आणखीन १ महीना उत्पादन येणार असून २ टन पर्यत उत्पादन आपेक्षीत आहे . हाच दर स्थिर राहीला तर १ लाख रुपये पर्यंत उत्पन येण्याची शक्यता नाकारता येत नाही . तात्पर्य मी श्री अजिनाथ शिवाजी कर्चे कुटूंबासह पुण्याला जाऊन २५ हजाराची नोकरीचा निर्णय झाला होता परंतू एकदा प्रयत्नाती परमेश्वर म्हणून प्रयत्न केला व यशस्वी झाला . कृषि विभागाने दिलेला मौल्यवाण सल्ला , महिती मार्गदर्शन , योजनाचा सहभाग , मिळालेले प्रोत्साहन व प्रोत्साहनपर अनुदान , स्वतःची व कुटूबाची जिदद , चिकाटी , कष्ट मुळे हे साध्य झाले . मी या द्वारे अहवान करू इच्छीतो को कष्ट करण्याची तयारी, प्रयत्न , नियोजन , जिदद , आत्मविश्वास व कृषि विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा सल्ला , मार्गदर्शन मुळे शेती क्षेत्राचे यश उंबरट्यावर आहे तरी खचून न जाता प्रयत्नांती परमेश्वर , केल्याने होत आहे रे अधि केलीची पहीजे या उकती प्रमाणे यश स्वयंनिर्भरता स्वयंपूर्णता शाश्वता शक्य आहे.
जय किसान ! जय विज्ञान ! जय सहकार !
अजिनाथ शिवाजी कर्चे
0 Comments