Hot Posts

6/recent/ticker-posts

जनावरांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल, तुळजापुर पोलीस ठाण्याची कारवाई

जनावरांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा  दाखल, तुळजापुर पोलीस ठाण्याची कारवाई

प्रतिनिधी रूपेश डोलारे धाराशिव 


 तुळजापुर : तालुक्यातील हंगरगा पाटी येथे जनावराची अवैध्य वाहतूक करून निर्दयीपणे वागणूक देणाऱ्या विरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की  अमीर महेबुब फकीर, रा. ताकविकी, ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.26.08.2023 रोजी 17.30 वा.सु. हंगरगा पाटी येथे पिकअप क्र एमएच 05 बीएच 5630 मध्ये क्षेमतेपेक्षा जास्त तिन मोठे खोंड पिकअपसह अंदाजे 2,40,000₹ किंमतीचे जनावरे दाटीवाटीने भरुन वाहतुक करत असताना फिर्यादी रोहीत राजेंद्र बागल वय 21 वर्षे, रा. सांगवी मार्डी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद मिळून आले. अशा मजकुराच्या फिर्यादी रोहीत राजेंद्र बागल यांनी दि.26.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे प्राण्यांना निर्दयपणे वागणूक कायदा कलम 11 (1)(के) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि 5, 5 (ए), 5 (बी) (ई) सह मो.वाका 83, 177 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments