Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी१ ६ सप्टेंबरपर्यंत ३ लाख ९२ हजार महिला लाभासाठी पात्र आतापर्यंत ४ लाख महिलांनी केले अर्ज

धाराशिव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी
६ सप्टेंबरपर्यंत ३ लाख ९२ हजार महिला लाभासाठी पात्र आतापर्यंत ४ लाख महिलांनी केले अर्ज

धाराशिव दि.१७ :राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 16 सप्टेंबरपर्यंत 4 लक्ष 3 हजार 851 महिलांनी अर्ज केले आहे.त्यापैकी 3 लक्ष 92 हजार 424 महिलांचे अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहे.आता या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांनीही अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आता केवळ अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज स्विकारले जाणार आहे.जिल्ह्यातील कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी यंत्रणा काम करीत आहे.

जिल्ह्यात 16 सप्टेंबरपर्यंत 3 लक्ष 92 हजार 424 महिलांचे अर्ज या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले.यामध्ये 2 लक्ष 4 हजार 215 अर्ज संकेतस्थळावर आणि नारीशक्ती दूत अँपवर प्राप्त झालेल्या 1 लक्ष 88 हजार 209 अर्जाचा समावेश आहे.

ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरत आहे अशा महिलांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येत आहे.पात्र महिलांच्या बँक खात्यात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्टपासून जुलै आणि ऑगस्ट महिन्याची एकत्र 3 हजार रुपये रक्कम जमा करणे सुरू झाले आहे.

जिल्ह्यात 3 लक्ष 24 हजार 659 पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट दिले असतांना पात्र ठरणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे.बहुतांश पात्र लाभार्थी महिलांनी अर्ज भरले आहे.उर्वरित पात्र महिलांची अर्ज भरण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे.आता 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील कोणतीही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून आता वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

16 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील 4 लक्ष 3 हजार 851 महिलांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन व नारीशक्ती दूत अँपवर अर्ज केले.यापैकी नारीशक्ती दूत अँपवर 1 लक्ष 89 हजार 892 महिलांनी अर्ज केले.तर पोर्टलवर अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या 2 लक्ष 13 हजार 959 इतकी आहे.

नारीशक्ती अँपवर प्राप्त 1 लक्ष 89 हजार 892 अर्जापैकी 1 लक्ष 88 हजार 209 महिलांच्या अर्जांना मान्यता दिली.पोर्टलवर 2 लक्ष 13 हजार 959 अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 2 लक्ष 4 हजार 215 अर्जाना मंजुरी मिळाली.अशा एकूण 3 लक्ष 92 हजार 424 अर्जाना तालुका समित्यांनी मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जिल्ह्यातील 3 लक्ष 24 हजार  659 महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट होते.त्यापेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले.ज्या पात्र महिलांचे अर्ज सादर करणे बाकी आहे,त्या महिलांचे आता नागरी आणि ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रात बालवाडी सेविका/अंगणवाडी सेविकामार्फत 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे.बँक खाते आधार संलग्न करणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनी अर्ज करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments