Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे समर्थ वाचनालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे समर्थ वाचनालयाचा उद्घाटन सोहळा  संपन्न


चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी इंदिरानगर येथे दिनांक 10 रोजी नूतन समर्थ वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. लोकांत वाचनाची आवड निर्माण व्हावी. जगभरातील घडामोडींबाबत माहिती मिळून ज्ञानात भर पडावी या उद्देशाने हे वाचनालय सुरू केले आहे.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती धाराशिव जिल्हा ग्रंथालय संघ कार्यवाहक सुरेश जोशी, जय भैरवनाथ वाचनालयाचे सोहेल पठाण सरपंच प्रशांत बिराजदार, विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन बालाजी शिंदे, व्हाईस चेअरमन मोतीराम चिमणे, ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच बालाजी पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष जाधव, ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील, भीमा देडे, रामकृष्ण मुळे, रत्नाकर चिमणे, शिवानंद पाटील, अतुल पाटील ब्रह्मानंद होगाडे, संजय सूर्यवंशी, दिलीप मिटकरी, संतोष गायकवाड ,तानाजी जाधव पत्रकार बिभीषण मिटकरी,नितीन गायकवाड, धीरज शिंदे, रोहित मिटकरी ,सिद्धार्थ बनसोडे, अविनाश मेंढापुरे, सुनील कांबळे वाचनालयाचे अध्यक्ष लक्ष्मण लोंढे उपाध्यक्ष रवी कांबळे सचिव स्वप्निल लोंढे आदींसह ग्रामस्थ तरुण उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments