धाराशिव- : सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर अनदुर जवळ कार व दुचाकीचा भीषण अपघात घडल्याची घटना दिनांक सात रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे यामध्ये दुचाकी वरील एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव प्रियंका गोरख दूधभाते राहणार धनगरवाडी तालुका तुळजापूर अशी आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की आहे. तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथील राहुल गोरख दूधभाते व त्यांच्या पत्नी प्रियंका गोरख दूधभाते हे दाम्पत्य नवरात्रीच्या पाचव्या मुळे निमित्त चिवरी येथील महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दुचाकी वर (Mh-13-ak-8746)निघाले होते. अनदुर जवळील हॅलो मेडिकल फाउंडेशन जवळ आले असताना सोलापूर येथून नळदृगच्या दिशेने निघालेल्या विना क्रमांकाच्या भरधाव कारणे दूधभाते दांपत्याच्या मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकी वर मागे बसलेल्या प्रियंका राहुल दूधभाते या खाली रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दुचाकी 100 मीटर फरफटत गेली होती. अपघातानंतर वाहन चालक कार सोडून फरार झाला आहे. मृताचे नळदृग येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर धनगरवाडी येथे दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले .राहुल आणि प्रियंका यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता, या घटनेमुळे परिसरात हळद व्यक्त होत आहे.मयत प्रियंका दूधभाते
0 Comments