तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील ज्येष्ठ नागरिक सिद्रामप्पा जळकोटे यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागनाथ जळकोटे यांचे ते वडील होते.
"""""""""""'""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (प्रतिनिधी):- तुळजापुर तालुक्यातील मौजे मौजे केशेगाव येथील ज्येष्ठ नागरीक वि.का.स.सो.लि.केशेगावचे माजी चेअरमन सिद्रामप्पा शिवबसप्पा जळकोटे यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दि.२९ मे रोजी रात्री ११ वाजता दु:खद निधन झाले आहे.
सिद्रामप्पा जळकोटे हे केशेगावातील ज्येष्ठ नागरीक व गावचे,समाजाचे मार्गदर्शक होते. गावच्या जडणघडणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता.दि.१४ जानेवारी १९३० रोजी त्यांचा जन्म केशेगावातील शेतकरी कुटुंबात झाला.निजामी राजवटीत अतिशय कठीण परीस्थितीत त्यांनी यशस्वी वाटचाल केली. रझाकाराच्या काळात ते गावच्या रक्षणासाठी ठामपणे उभे होते.धनगरवाडी जि.प.प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.नागनाथ सिद्रामप्पा जळकोटे सर व कुलस्वामिनी विद्यालय,तुळजापूर येथील सहशिक्षक शिवशंकर सिद्रामप्पा जळकोटे यांचे ते वडील आहेत.
कडक शिस्तीचे ते भोक्ते होते.निर्व्यसनी व्यक्ती म्हणुन ते परीचित होते.धार्मिक व आध्यात्मिक स्वभावाचे आदर्श आचरण करणारे सज्जन व्यक्तिमत्व म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जात असे गावच्या कठीण पेचप्रसंगात त्यांचे मार्गदर्शन सर्वांना उपयोगी पडत असे.शिक्षणमहर्षी कै.सि.ना.आलुरे गुरूजी यांचे ते खंदे समर्थक होते.केशेगावात साने गुरुजी विद्यालयाची उभारणी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.गावातील मुलामुलींना शिक्षण मिळावे म्हणुन त्यांनी खुप धडपड केली.सिद्रामप्पा जळकोटे यांच्या दु:खद निधनाने खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांचा अंत्यविधी शुक्रवार दि.३० मे रोजी केशेगाव येथे करण्यात आला.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे,जावई,नाती,नातु,नात जावई ,पणतु असा मोठा परीवार आहे.
0 Comments