दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा आज निकाल; दुपारी १ वाजता या संकेतस्थळावर पहा तुमचा निकाल-Ssc Results &Hscresult

Hot Posts

6/recent/ticker-posts

दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा आज निकाल; दुपारी १ वाजता या संकेतस्थळावर पहा तुमचा निकाल-Ssc Results &Hscresult

दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा आज निकाल; दुपारी १ वाजता  या संकेतस्थळावर पहा तुमचा निकाल


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून जुलै 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक 29 जुलै रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.

ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी तसेच पुनर्वल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. संकेतस्थळावर याबाबतचे अटी व शर्ती देण्यात आली आहेत गुण पडताळणी व छायांकित प्रतीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

पुरवणी परीक्षेच्या उत्तर पत्रिकेचे पुनर् मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावर प्रथमता उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घेणे अनिवार्य आहे छायांकित प्रत मिळाल्याच्या पाच दिवसापासून पुढे पुनर मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करता येणार आहे उत्तर पत्रिकेचे पुनर्वल्यांकन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा अशी आवाहन करण्यात आले आहे.

या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता ऑनलाइन होणार निकाल जाहीर

दहावीचा निकाल येथे पहा

बारावीचा निकाल येथे पहा

Post a Comment

0 Comments