दुर्दैवी घटना :२४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू , मुलगा-नातवाच्या धसक्याने आजोबांनीही सोडला प्राण,प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा बळी

Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना :२४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू , मुलगा-नातवाच्या धसक्याने आजोबांनीही सोडला प्राण,प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा बळी

दुर्दैवी घटना :२४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू , मुलगा-नातवाच्या धसक्याने आजोबांनीही सोडला प्राण,प्रशासनाच्या ढिसाळ  कारभाराचा बळी-


बारामती/प्रतिनिधी -रूपेश डोलारे  : शहरात रविवारी खंडोबा नगर येथे झालेल्या भीषण अपघाताने शहरातील प्रत्येक नागरिक हळहळला या अपघातात ओंकार आचार्य वय (36) व त्यांच्या दोन चिमुकल्या मुली सई वय (10) मधुरा वय (4) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर सोमवार दिनांक 28 रोजी मुलगा व नातवांडाच्या मृत्यूचा धक्का सहन झाल्याने ओंकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य वय (70) यांचा पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला या घटनेमुळे आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की रविवारी शहरातील महात्मा फुले चौकात डंपरने डोसा किल्ला दिलेल्या धडकेत ओंकार आचार्य व त्यांच्या दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला बाप लेकीचा रविवारी सायंकाळी अंत्यविधी झाला. तर सोमवारी ओंकार आचार्य यांचे वडील निवृत्त शिक्षक राजेंद्र आचार्य हे आजारी होते मात्र मुलगा व नातींच्या मृत्यूचा धक्का सहन झाल्याने सोमवार दिनांक 28 रोजी त्यांचा मृत्यू झाला आचारी कुटुंबात आता ओंकार यांची पत्नी अरुणा आई शैलेजा व भाऊ अमोल हे आहेत.

राजेंद्र आचार्य यांचे मुलाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निधन झाल्याचे समजल्यानंतर खंडोबा नगर येथील सर्व रहिवाशांनी अपघात झालेल्या महात्मा फुले चौकात रास्ता रोको करत रस्त्यावरच ठिय्या मांडत ताबडतोब स्पीड ब्रेकर व सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केल्यावर स्पीड ब्रेकर चे काम सुरू झाले तर डंपर चालक दशरथ दत्तात्रय डोळे याला पोलिसांनी अटक करत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे दीपक कोळपकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड मुख्य अधिकारी पंकज भुसे उपस्थित होते आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आचार्य कुटुंब सुशिक्षित कष्टाळू व प्रामाणिक होते मात्र कालच्या अपघाताने या कुटुंबाची अवस्था होत्याची  नव्हती अशी झाली 24 तासात चार अंत्यसंस्कार झाल्याने बारामतील प्रत्येक नागरिकांनी हळूहळू व्यक्त करत प्रशासनाच्या ढीसाळ कारभार व अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राजेंद्र आचारी हे जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त शिक्षक होते त्यांनी सणसर, हिंगणेवाडी परिसरात शिक्षक म्हणून काम पाहिले विद्यार्थी वर्गात आचार्य गुरुजी लोकप्रिय होते गेल्या महिन्यापासून आचारी हे मधुमेहाने त्रस्त होते त्यांच्यावर बारामती येथील खाजगी रुग्णालय जवळपास 25 दिवस अति दक्षता विभागात उपचार सुरू होते उपचारानंतर आचार्य शनिवारी दिनांक 26 रोजी घरी सोडण्यात आली होते.अतिदक्षता विभागात असणारे आजारी वडिलांना घरी आणल्याने ओंकार आनंदी होता त्यांनाच फळे आणण्यासाठी रविवारी दिनांक 27 रोजी ओंकार त्यांच्या दोन मुली सई  व मधुरा या घराबाहेर पडल्या मात्र डंपर आणि दुचाकी मध्ये झालेल्या श अपघातात अक्षरशा चिरडले यामध्ये या तिघांचा जागीच मृत्यू झाला हा धक्का सह न झाल्याने राजेंद्र आचार्य यांची देखील सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्यावर निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण बारामती शहरात हळूहळू व्यक्त  होत आहे.

Post a Comment

0 Comments