तुळजापूर : काटी येथे घरफोडी; रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास-
तुळजापूर (धाराशिव) प्रतिनिधी :
तालुक्यातील काटी येथे घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दशरथ अनंता मदणे (वय 32, रा. काटी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 01 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरात ठेवलेली रोख रक्कम 40,000 रुपये तसेच अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे 60,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.
या घटनेबाबत फिर्यादी दशरथ मदणे यांनी दि. 25 मार्च 2026 रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 331(3), 305(ए) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. तसेच चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
👉 पोलिसांचे नागरिकांना आवाहन : घर सोडताना योग्य सुरक्षा व्यवस्था ठेवावी, शेजाऱ्यांना माहिती द्यावी व संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.

0 Comments