शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन मराठा मोर्चाला प्रारंभ ;मनोज जरांगे-पाटील यांची होणार मुंबईकडे आगेकूच-Manoj Jarange Patil Live
पुणे : मनोज जरांगे पाटील हे बुधवारी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून त्यांच्या ताफ्यासह आळेफाटा ओतूर मार्गे जुन्नर येथे मुक्कामी येणार असून गुरुवारी सकाळी ८ वाजता किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर शहरातील पाच रस्ता चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ जरांगे पाटील मोर्चाला संबोधित करणार आहेत.
मोर्चाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील पेमदुरे, आणि बेल्हे, राजुरी ,आळेफाटा, वडगाव ,पिंपरी पेंढार खामुंडी ओतूर बनकर फाटा जुन्नर नारायणगाव येथील सर्व सकल मराठा समाज बांधवाकडून चौक नियोजन करण्यात आले आहे जुन्नर तालुक्यातील मोर्चाच्या मार्गावरील सर्व मंगल कार्यालय संस्थानाची मैदानी सभागृहे जुन्नर शहरातील सर्व समाज मंदिर या ठिकाणी निवासाची व पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती गणेश महाबरे संदेश बारावे, सुनील ढोबळे ,नरेंद्र तांबोळी,विवेक पापडे ,डॉ. विशाल आमले ,प्रवेश देवकर, शिवम घोलप ,सौरभ गुंजाळ ,बाबू घोगरे ,धनंजय ढोमसे, विवेक खंडागळे ,सिद्धेश ढोले यांनी दिली.
दरम्यान जुन्नर तालुक्यातील मोर्चाच्या मार्गावर सकल मराठा समाज बांधवाकडून स्टॉल जेवण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पार्किंग निवास व्यवस्था करण्यात आली असून तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याची आव्हान सकल मराठा समाज शिवजन्मभूमी जुन्नर यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच समन्वयक संदेश बारावे म्हणाले की मोर्चा प्रसंगी कोणते गालबोट न लागता समाजाने स्वयंशिस्त राखावी.

0 Comments