बीड :मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरण: पुढील सुनावणी 19 डिसेंबरला-
बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 19 डिसेंबर रोजी होणार आहे. बचाव पक्षाच्या वकिलांनी पुढील तारीख मागितल्याने शुक्रवार दि, 12 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश पी व्ही पाटवदकर यांनी पुढील तारीख दिली.
केज तालुक्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्गुण पद्धतीने हत्या करण्यात आली होती .या प्रकरणी वाल्मीक कराडसह इतर आरोपी अटक करण्यात आले होते मागील वर्षभरात या प्रकरणाची केज व नंतर बीड येथील विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली .शुक्रवारी झालेल्या सुनावणीत बचाव पक्षाचे वकील यांनी साक्षी पुरावे सादर करण्यासाठी पुढील तारीख मागितली. त्याला सरकारी पक्षाच्या वकीलांनी जोरदार विरोध केला. दरम्यान नंतर तासभराच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने दोषारूप निश्चितीसाठी 19 डिसेंबर रोजी पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.

0 Comments