बनावट लग्न लावून तरुणाची फसवणूक! सोन्याच्या दागिन्यासह अडीच लाख रुपये घेऊन लुटेरी दुल्हन पसार; धाराशिव जिल्ह्यातील धकादायक प्रकार-
![]() |
| प्रातिनिधीक फोटो |
धाराशिव : तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून बनावट लग्न लावून सोन्याच्या दागिने सह अडीच लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यामध्ये घडला आहे याप्रकरणी बनावट नवरी सह दोन जणांवर परंडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, परंडा तालुक्यातील रोसा येथील तरुण लक्ष्मण दशरथ कोरे यांना लग्नाचे आमिष दाखवुन अनिल श्रीमंत माने ,तानाजी नारायण वर (दोघे राहणार शेलगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर) व सुरेखा जाधव (राहणार लातूर) यांनी बनावट लग्न लावून सोन्याचे दागिने सह रोकड घेऊन फसवणूक केली; यामध्ये आरोपीने लक्ष्मण कोरे यांना तुझे लग्न लावून देतो अशी खोटे आश्वासन देऊन फसवणुकीचा कट रचला. यामध्ये कोरे यांना बनावट नवरी सुरेखा जाधव यांच्याशी लग्नही लावून दिले त्यानंतर नमूद आरोपीने कोरे यांना तुझे लग्न लावून दिले आहे आम्हाला दोन लाख 50 हजार रुपये व दीड तोळे सोने देण्याची मागणी केली; फिर्यादी कोरे यांनी विश्वास ठेवून नमूद आरोपींना पैसे व सोने दिले त्यानंतर बनावट नवरी सुरेखा जाधव ही एक महिन्याचे आतमध्ये अडीच लाख रुपये व दीड तोळे सोने घेऊन पसार झाली.हा प्रकार 21 जुलै 2025 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये घडला. यानंतर फिर्यादी लक्ष्मण कोरे यांना आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठुन नमूद आरोपीविरुद्ध दि.13.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम 318(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास परंडा पोलीस करत आहेत.
सध्या लग्नाळू तरुणांना मुली मिळत नसल्याने विवाहाच्या समस्या जटील झाली आहे. मुलाचे वय वाढत चालल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यातून अनेकदा एजंटामार्फत फसवणुकीचे तसेच लुटेरी दुल्हन सारखे प्रकार देखील घडत आहेत. यामुळे वर पक्षाच्या कुटुंबीयांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

0 Comments