चिवरी : तीन वर्षाच्या प्रत्यक्षेनंतर अखेर चिवरी येथे बस सेवा सुरू; प्रतीक रोचकरी यांच्या पाठपुराव्यामुळे एसटी बस सेवा सुरू-
तुळजापूर प्रतिनिधी /रुपेश डोलारे : मागील ३ वर्षांपासून तुळजापूर तालुक्यातील चिवरी गावात एस.टी. महामंडळाची बससेवा बंद असल्यामुळे नागरिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या गंभीर विषयाची दखल घेत एस.टी. महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून समन्वय साधत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बप्पा रोचकरी यांनी नागरिकांची होत असलेल्या गैरसोयीबद्दल ठोस भूमिका मांडून तात्काळ येथील बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
ही सेवा सुरू झाल्यामुळे गावातील विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.जनतेच्या मूलभूत गरजांसाठी सातत्याने लढणं आणि प्रश्न मार्गी लावणं ही माझी भूमिका असल्याचे श्री प्रतीक रोचकरी यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. बस सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे ग्रामस्थ विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

0 Comments