अवैद्य गांजा शेतीवर पोलिसांचा छापा, 1 लाख 41 हजार 150 रुपयाचा मुद्देमाल जप्त- शेतकऱ्यावर गुन्हा दाखल धाराशिव पोलिसांची कारवाईची मोहीम सुरू-Dharashiv Police Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

 धाराशिव: जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यापासून अवैध  गांजाविरोधी कारवाईची मोहीम सुरू आहे .यामध्ये वाशी तालुक्यातील दस्मेगाव तसेच पानगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिनांक 14 रोजी छापा टाकून अवैद्य असू पाने व बोंडे असलेल्या वनस्पती जप्त करून शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यात अवैध  गांजा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की येरमाळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध गांजा विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.14.03.2025 रोजी 14.52 वा. सु. येरमाळा पो ठाणे हद्दीत पानगाव शिवारातील शेत गट नं 141/ब 4 मध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बाबासाहेब पंढरीनाथ वाघमारे, वय 55 वर्षे, रा. पानगाव ता. कळंब जि. धाराशिव 14.52 वा.सु. आसु शिवार शेत गट नं 09 मध्ये आसु  पाने व बोंडे  असलेले वनस्पतीचे लहान मोठे एकुण 258 झाडे वजन 4किलो 705 ग्रॅम अंदाजे 1,41,150 ₹किंमतीचे चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने स्वत:चे शेतात लागवड केलेली येरमाळा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी नमुद मुद्देमाल जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम-8(सी), 18 (सी) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास येरमाळा पोलीस करत आहेत. 

Post a Comment

0 Comments