खळबळ जनक घटना : कला केंद्रावर बारी पाहण्यासाठी आलेल्या तरुणाचा मित्रांनीच केला खून, धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dance Bar Dharashiv Crime News
येरमाळा : धाराशिव जिल्ह्यातून एक मोठी खळबळ जनक अपडेट घटना समोर आली आहे, धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रावर बीड (Beed District) जिल्ह्यातील साळेगाव येथील एक तरुण कला केंद्रावर मित्रा समवेत तमाशा बघायला आला होता याच दरम्यान त्याच्याच मित्रांनी दारू पाजून बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge Suicide) आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच या खळबळ जनक घटनेने पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र वादाच्या भौऱ्यात सापडली आहेत. मागील काही दिवसांपासून धाराशिव, बीड आणि सोलापूर (Solapur)येथील कलाकेंद्रावर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बार्शी (Barshi)येथील नर्तिका पूजा गायकवाडच्या प्रेमात एका माजी उपसरपंचाने आत्महत्या केली होती. त्याने कार आतून बंद करत स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. तसेच धाराशी जिल्ह्यातील एका तरुणाने नर्तिकीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा कलाकेंद्रावर बारी (नर्तिकेचा डान्स) बघायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात (Yermala Police Station) मयताचे वडील भागवत मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 Comments