धक्कादायक प्रकार: अज्ञात व्यक्तीने द्राक्ष बागेवर फिरवला ट्रॅक्टर; शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान सांगली जिल्ह्यातील घटना-Sangli District farmers grapes Damage

Hot Posts

6/recent/ticker-posts

धक्कादायक प्रकार: अज्ञात व्यक्तीने द्राक्ष बागेवर फिरवला ट्रॅक्टर; शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान सांगली जिल्ह्यातील घटना-Sangli District farmers grapes Damage

धक्कादायक प्रकार: अज्ञात व्यक्तीने द्राक्ष बागेवर फिरवला ट्रॅक्टर; शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान सांगली जिल्ह्यातील घटना-Sangli District farmers grapes Damage


सांगली : जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील खटाव येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी विश्वजीत आनंदराव पाटील यांच्या द्राक्ष बागेत अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर फिरवून मोठे नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या नुस्कांमुळे विश्वजीत पाटील हे आर्थिक संकटात सापडले आहेत.


विश्वजीत पाटील यांच्या घराशेजारीच सुमारे दोन एकर क्षेत्रावर द्राक्षाची बाग असून सध्या बागेत चांगल्या प्रतीचे पीक आले होते. अवघ्या महिन्याभरात हे द्राक्षफळ मार्केटमध्ये जाण्याच्या तयारीत होते. मात्र अज्ञात इसमाने पाटील यांच्या घराजवळ उभा असलेला ट्रॅक्टर घेऊन थेट द्राक्ष बागेत घुसवला आणि संपूर्ण बागेत ट्रॅक्टर फिरवून मोठी हानी केली.या प्रकारात अंदाजे साडेतीनशे ते चारशे द्राक्ष झाडांचे नुकसान झाले असून ट्रॅक्टरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.लोखंडी अँगल, तारा यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

 ऐन हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी पाटील कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे.घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक पाटील, पोलीस शिपाई स्वप्निल शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. संबंधित घटनेचेसीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून संशयित आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात पोलिसांना यश येईल, असा विश्वास घटनास्थळावर उपस्थीत शेतकऱ्यांना वाटत आहे.

दरम्यान संबंधित ट्रॅक्टर पूर्व वैमनस्यातून, राजकीय सूडबुद्धीतून, चोरीच्या उद्देशाने का अन्य कोणत्या  कारणाने नेण्याचा प्रयत्न केला जात होता की शेतीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने द्राक्ष बागेमध्ये ट्रॅक्टर फिरवला गेला याचा शोध भिलवडी पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात संतापाची भावना व्यक्त होत आहे. दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गातून होत आहे.



Post a Comment

0 Comments