कळंब : पुतळा व जयंतीसाठी वर्गणी न दिल्याच्या कारणावरून एकास रॉडने बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Dharashiv Crime News
धाराशिव : पुतळा व वर्गणी न दिल्याच्या कारणावरून एकास सळईने बेदम मारहाण केल्याचे गंभीर घटना कळम तालुक्यातील मोहोळ येथे दिनांक 20 रोजी घडली याप्रकरणी फिर्यादी अमोल कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी नामे-बाबासाहेब सोमनाथ कसबे, राहुल सोमनाथ कसबे, नाना सोमनाथ कसबे, प्रियांका बाबासाहेब कसबे, शितल राहुल कसबे, सर्व रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.20.03.2026 रोजी 14.00 वा. सु. मोहा येथील समाज मंदीरासमोर मोहा येथे फिर्यादी नामे-अमोल मुकुंद कसबे, वय 39 वर्षे, मोहा ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु पुतळ्यासाठी व जयंतीसाठी पट्टी दिली नाहीस तुझा येथे यायचा काय संबंध नाही असे म्हणुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, रॉडने मारहाण करुन जखमी केले. परत आलास तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अमोल कसबे यांनी दि.20.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे कळंब येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352, 189(2), 191(2), 191(3), 190, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास कळंब पोलीस करत आहेत.

0 Comments