सहाय्यक फौजदारपदी निवड झाल्याबद्दल बलभीम वाघमारे यांचा इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सपत्नीक सत्कार-Itkal News

Hot Posts

6/recent/ticker-posts

सहाय्यक फौजदारपदी निवड झाल्याबद्दल बलभीम वाघमारे यांचा इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सपत्नीक सत्कार-Itkal News

सहाय्यक फौजदारपदी निवड झाल्याबद्दल बलभीम वाघमारे यांचा इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सपत्नीक सत्कार-Itkal News 


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (प्रतिनिधी – दिनेश सलगरे):

तुळजापूर तालुक्यातील मौजे खानापूर येथील रहिवासी व सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले बलभीम वाघमारे यांची सहाय्यक फौजदार (ASI) पदावर नुकतीच निवड झाल्याबद्दल इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बलभीम वाघमारे यांनी पोलीस दलात प्रवेश केला. मागील सुमारे २५ वर्षांपासून ते मुंबई पोलीस दलात पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावत होते. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची आणि मेहनतीची दखल घेत त्यांची नुकतीच सहाय्यक फौजदार पदावर नियुक्ती झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन तसेच पेढा भरवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी पोलीस पाटील अमोल हिप्परगे, सामाजिक कार्यकर्ते शंकर वाघमोडे, पत्रकार दिनेश सलगरे, नामदेव गायकवाड, लियाकत खुदादे, बालाजी गायकवाड, चांद शेख यांच्यासह वाघमारे कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वाघमारे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रतिकूल परिस्थितीतून यश संपादन करून त्यांनी तरुणांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.

Post a Comment

0 Comments