शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी झाला अन् दागिन्यांच्या हव्यासापोटी ७५ वर्षीय वृद्ध महिलेची केली निर्गुण हत्या -बार्शीत संतापजनक घटना”-Barshi Crime news #murder
सोलापुर | प्रतिनिधी – झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुणाई शेअर मार्केटमध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंग, इंट्राडे, फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करते. चुकीचे निर्णय, घाईगडबड आणि अवास्तव नफ्याच्या अपेक्षेमुळे अनेक तरुण मोठे आर्थिक नुकसान सोसत कर्जबाजारी होत आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे कर्जबाजारी झालेल्या एका तरुणाने आपले कर्ज फेडण्यासाठी वृद्धेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे सदर तरुण गेल्या 5 वर्षांपासून वृद्धेच्या घरी भाडोत्री म्हणून राहत होता.
बार्शी तालुक्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. बार्शीत जुन्या विश्वासू भाडेकऱ्याने दागिन्यांसाठी चक्क घर मालकिणीचा खून केला आहे. बार्शीतील हांडे वस्ती येथे ही घटना घडली असून आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. गंगुबाई कालिदास गडदे(वय 73,राहणार,हांडे गल्ली बार्शी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. बार्शी पोलिसांनी चांगदेव गोवर्धन पाटील (वय 35,राहणार हत्तीज,जि सोलापूर ) याला वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी ताब्यात घेतले आहे. या घटनेने सोलापूरात मोठी खळबळ उडाली आहे.

0 Comments