धाराशिव - श्रद्धेला प्रश्न विचारणे मूलभूत कर्तव्याचा भाग- ॲड.असीम सरोदे -Dharashiv News

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव - श्रद्धेला प्रश्न विचारणे मूलभूत कर्तव्याचा भाग- ॲड.असीम सरोदे -Dharashiv News

 धाराशिव - श्रद्धेला प्रश्न विचारणे मूलभूत कर्तव्याचा भाग- ॲड.असीम सरोदे -Dharashiv News 



धाराशिव - भारताच्या संविधानामध्ये श्रद्धेचे स्वातंत्र्य जसे दिले आहे, तसेच चिकित्सा व प्रश्न विचारण्याचे कर्तव्य ही नागरिकांना दिले आहे .त्यामुळे श्रद्धेला ही प्रश्न विचारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ॲड.असीम सरोदे यांनी धाराशिव येथे बोलताना केले.

 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या धाराशिव शाखेच्या वतीने शुक्रवार 3 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत  होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित "कायदा व राजकारणातील भोंदूगिरी "या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 


पुढे बोलताना ॲड.सरोदे म्हणाले की,कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या न्यायाधीशापासून वकिलांपर्यंत असलेले लोक कसे अंधश्रद्धांचे बळी आहेत.ते सार्वजनिक स्वरूपात आपले कर्तव्य बजावत असताना ते अंधश्रद्धांच्या बाबतीत कसे वर्तन करतात. याचे सविस्तर विवेचन असीम सरोदे यांनी आपल्या भाषणात केले.

तसेच राजकारणात सध्या असलेल्या भोंदूगिरीवर त्यांनी जोरदार टीका केली. सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी ही भोंदूगिरीत सामील आहेत याची सविस्तर माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली.

धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील,माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी मुख्याध्यापक श्री पडवळ, माजी मुख्याध्यापक एम .डी.देशमुख, ॲड.जयंत जगदाळे, ॲड.बापू काजळे धर्मवीर कदम, ॲड.राज कुलकर्णी, पत्रकार रवींद्र केसकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.अस्मिता बालगावकर आणि चंद्रकांत उळेकर यांनी चळवळीची गाणी म्हटली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.रवींद्र मैंदाड यांनी केले. तर डॉ. अस्मिता बालगावकर या यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ॲड.राम यांनी केले. तर आभार प्रदर्शन चंद्रकांत उळेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी धाराशिव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments