मौजे इटकळ येथील ग्रामदैवत शेख दाऊदवली यात्रा महोत्सवाला ९ एप्रिल पासून सुरुवात-Itkal News
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (प्रतिनिधी): मौजे इटकळ येथील ग्रामदैवत शेख दाऊदवली यांच्या यात्रा महोत्सवाला यंदा गुरुवार, दि. ९ एप्रिल २०२६ पासून उत्साहात प्रारंभ होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रेच्या पहिल्या दिवशी, गुरुवार दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत पारंपरिक संदल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार दि. १० एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असून, दिवसभर भाविकांकडून नवस पूर्ण करणे व नैवेद्य दाखवणे असे धार्मिक कार्यक्रम पार पडतील. सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत शोभेचे दारूकाम होणार असून, त्यानंतर कव्वालीचा जंगी मुकाबला रंगणार आहे. या मुकाबल्यात बेंगलोरच्या प्रसिद्ध कव्वाल आफरीन सुलताना व नगरचे कव्वाल शाहेद आजमेरी सहभागी होणार आहेत.यात्रेचा समारोप शनिवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता दर्गा परिसरात जंगी कुस्त्यांच्या फडाने करण्यात येणार आहे.यात्रा महोत्सव कमेटीचे अध्यक्ष लियाकत खुदादे व उपाध्यक्ष हारूण शेख यांनी परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेतील विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

0 Comments