परभणी : वडिलांनी मोबाईल बघू नको म्हटल्याने मुलाचे टोकाचे पाऊल ; मुलाची गळफास घेऊन आत्महत्या- परभणी जिल्ह्याची घटना-Suicide News Parabhani District
परभणी: परभणी जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील दहावी मध्ये 91 टक्के गुण घेतलेल्या मुलाने वडील मोबाईल कमी बघ अभ्यास कर असे का म्हणाले याचा राग मनात धरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सायंकाळी घडली .
शिवम गोविंद शिंदे असे मृत मुलाचे नाव असून या घटनेने कुटुंबावर व गावावर शोककळा पसरली आहे शिवम एकुलता एक मुलगा होता शिवम नवीन मोबाईल घेण्यासाठी हट्ट धरल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्याला मोबाईल घेण्यासाठी पैसे दिले होते. शुक्रवारी आखाडा बाळापूर येथून नवीन मोबाईल खरेदी करून सायंकाळच्या सुमारास घरी परतला होता एवढा महागडा मोबाईल कशाला घेतलास आता सारखा मोबाईल पाहू नकोस अभ्यास कर असा समजवण्याचा प्रयत्न कुटुंबाने सल्ला अगदी सहज दिला होता.
मात्र शिवमच्या मनाला तो तीव्रतेने लागला घरच्यांनी बोलण्याचा प्रचंड राग आल्याने शिवम थेट स्वतःला खोलीत कोंडून घेतले दरम्यान बऱ्याच वेळानंतर ही शिवम खोली बाहेर येत नसल्याने त्यांनी खोलीता दरवाजा ठोठावला पण आतून काहीच हालचाल जाणवली नाही. अखेर कुटुंबीयांनी दरवाजा उघड व असता शिवमणे गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घरच्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले डॉक्टरांनी त्याला तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले .केवळ मोबाईल वरून बोलल्यामुळे एका बालकाने एवढे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

0 Comments