धाराशिव :शासकीय कामात अडथळा; पोलिसांच्या कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा-Dharashiv Crime News Live
धाराशिव, प्रतिनिधी : शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांच्या कामकाजात अडथळा निर्माण करून वाहन आडवे लावत धमकी दिल्याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास जहागीरदारवाडी शिवारातील रेल्वे ब्रिजजवळ धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी अविनाश दिगंबर शिंदे हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह शासकीय कामकाज पार पाडत होते. त्यावेळी आरोपी आकाश विनायक राठोड, अशोक जानराव राठोड, अतुल राजेंद्र पवार, प्रल्हाद राठोड यांच्यासह अन्य पाच जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पोलिसांच्या वाहनासमोर वाहन आडवे लावले.
तसेच, "तुम्ही येथे केस करायच्या नाहीत," असे म्हणत पोलिसांना अडवून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी अविनाश दिगंबर शिंदे यांनी ७ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी आकाश विनायक राठोड, अशोक जानराव राठोड, अतुल राजेंद्र पवार, प्रल्हाद राठोड व अन्य पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२१, १२६(२), १८९(२), १९० आणि ३५१(२)(३) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

0 Comments