/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> जिजामाता तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी सुजय शेळके; नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड

Hot Posts

जिजामाता तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी सुजय शेळके; नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड

 

जिजामाता तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी सुजय शेळके; नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड


तुळजापूर | प्रतिनिधी

तुळजापूर येथील जिजामाता प्रतिष्ठान प्रणित जिजामाता तरुण गणेश मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची निवड उत्साहात पार पडली. मंडळाच्या अध्यक्षपदी सुजय शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच यश शिरसाट यांची उपाध्यक्ष, कुणाल शेळके यांची सचिव आणि रितेश सरडे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी मंडळाचे मार्गदर्शक सतीश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी नगरसेवक चंद्रशेखर (माऊली राजे) भोसले, नगरसेवक मधुकर (भैय्या) शेळके, शेखर फुगारे, राहुल जाधव, राहुल जगताप, माऊली भोसले, किरण मोरे, पारस शेळके, आदित्य गोरे, आकाश गोरे, रोहित गायकवाड, अण्णा शिंदे, सुमित देशमाने, रोहित जाधव, वैभव सुरवसे, भैय्या भोसले, अभिषेक शिरसाट आणि मंगेश गोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करत सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांद्वारे मंडळाने समाजहिताची परंपरा अधिक बळकट करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आगामी गणेशोत्सव अधिक उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा निर्धार नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments