मौजे सलगरा मडी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी ह.भ.प. मारुती महाराज सोमवंशी यांची एकमताने निवड
------------------------------------------
उपाध्यक्षपदी सौ. वैशाली श्रावण बनसोडे; खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रिया संपन्न.
------------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे सलगरा मडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी ह.भ.प. मारुती महाराज सोमवंशी यांची सर्वानुमते व एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सौ. वैशाली श्रावण बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.शालेय शिक्षण समितीच्या आज झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी ह.भ.प. मारुती महाराज सोमवंशी यांच्या नावाला सर्व सदस्यांनी एकमताने पसंती दिली. उपाध्यक्षपदी सौ. वैशाली श्रावण बनसोडे यांची निवड करण्यात आली.समितीच्या सदस्यपदी महेश मोरे, दत्तात्रेय अंकुश मोरे, धनराज जावळे, सौ. सुवर्णा ज्ञानेश्वर चव्हाण, सौ. बिस्मिल्ला मकानदार, पुनम कृष्णा सुरवसे व दीपा अमोल भालेराव यांची निवड करण्यात आली. तसेच शिक्षक तज्ज्ञ म्हणून माजी मुख्याध्यापक फुलचंद शिवराम चव्हाण यांची निवड करण्यात आली.या निवड प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गणपती राठोड, महादेव सरवदे सर व प्रमोद जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शाळेच्या भौतिक सुविधांच्या विकासासाठी तसेच पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधून शाळेच्या प्रगतीला चालना देण्यासाठी नवनिर्वाचित समिती प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले. समितीच्या कामकाजासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

0 Comments