/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> पत्रकार दयानंद काळुंके यांना मातृशोक; सखुबाई काळुंके यांचे निधन

Hot Posts

पत्रकार दयानंद काळुंके यांना मातृशोक; सखुबाई काळुंके यांचे निधन

पत्रकार दयानंद काळुंके यांना मातृशोक; सखुबाई काळुंके यांचे निधन

पुण्यात घेतला अखेरचा श्वास; बाभळगाव येथे आज सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार

अणदुर  : दैनिक लोकमतचे पत्रकार तथा बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुंके यांच्या मातोश्री कै. सखुबाई काळुंके यांचे गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच काळुंके कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

कै. सखुबाई काळुंके या कुटुंबातील ज्येष्ठ आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होत्या. त्यांच्या निधनाने काळुंके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबीयांनी आपल्या आधारवडाला गमावले आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता बाभळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी काळुंके कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!

कै. सखुबाई काळुंके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून काळुंके कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.

— बालाघाट न्यूज टाइम्स परिवार

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>