/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> माळशिरस तालुका राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान

Hot Posts

माळशिरस तालुका राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान

माळशिरस तालुका राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा  सन्मान 

 


नातेपुते प्रतिनिधी / बालाघाट न्युज टाइम्स : ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या माळशिरस तालुका नूतन पदाधिकाऱ्यांचा माळशिरस तालुका शिवसेना (शिंदे गट) तालुका उपप्रमुख सतीश सपकाळ व नातेपुते शहर प्रमुख समीर शेख यांच्याकडून मानाचा फेटा बांधून  सतीश सपकाळ यांच्या निवासस्थानी सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष अभिमन्यू आठवले, उपाध्यक्ष श्रीराम भगत महाराज, तालुका कार्याध्यक्ष विलास भोसले, तालुका सरचिटणीस उमेश पोतदार, तालुका सचिव हनुमंत माने उपस्थित होते 

      सत्कार प्रसंगी तालुका उपप्रमुख सतीश सपकाळ म्हणाले पत्रकारांची संघटना असणं काळाची गरज आहे आपण अन्याय विरुद्ध निर्भीडपणे बातम्या देत असता त्यामुळे एकाद्या  पत्रकारावर अन्याय झाला तर त्याविषयी आवाज उठवण्यासाठी पत्रकारांची संघटना असणे महत्वाचे आहे आपल्या पत्रकार संघटनेच्या मार्फत सामाजिक उपक्रम ही राबविले जावेत व एकजुटीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा यावेळी  तालुका अध्यक्ष अभिमन्यू आठवले म्हणाले आमच्या तालुका पत्रकार संघातील नूतन पदाधिकाऱ्यांचा सतीश सपकाळ यांनी पहिल्यांदा आमचा सन्मान करून आमच्या लेखणीला अन्यायाविरुद्ध लढण्याचे अधिक बळ दिले आमच्या पत्रकार संघाच्या मार्फत नातेपुते सह तालुक्यात चांगले उपक्रम राबवून या पत्रकार संघाची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा आम्ही पत्रकार संघातील सर्व पदाधिकारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी नातेपुते शिवसेना शिंदे गट शहराध्यक्ष समीर शेख, भाजपा माळशिरस तालुका अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष बाबुराव खिलारे, अक्षय मिसाळ, विशाल खुडे, संतोष लांडगे, रुपेश लांडगे, सतीश लांडगे, गणेश लांडगे, किसन पाटोळे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments